ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 23 - नेरी ते औरंगाबाद रोडवरील माळपिंप्रीकडे जाणा:या रस्त्यावर उभ्या ट्रकमधील चालकाला लुटण्याचे संशयितांनी नियोजन केले होत़े यासाठी त्यांनी उमर्टी येथून दोन पिस्तूल (गावठी कठ्ठे) व काडतूस विकत घेतले होत़े हे घेण्यासाठी त्यांच्यासोबत संशयित पोलीस कर्मचारी सुशील मगरेही गेला होता़,अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़ या गुन्ह्यात मगरेवर निलंबनानंतर वरिष्ठांकडे बडतर्फीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचेही कराळे यांनी सांगितले.12 सप्टेंबर 2017 रोजी माळपिंप्रीजवळ दत्तात्रय भाऊसाहेब फुलारे या ट्रक चालकाला तीन संशयितांनी 4 हजार रुपये रोख लुटून नेले होत़े पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय अधिकारी केशव पतोंड यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नजीक शेख, पीएसआय विकास पाटील, कर्मचारी संजय जाधव, ईस्माईल शेख, योगेश सुतार, सचिन पोळ, राजेंद्र कांडेलकर, निलेश घुगे, तुषार पाटील यांच्या पथकाने अटक केली़ भूषण बोंडारेवर 27 गुन्हे दाखल आहेत. यात इतरही काही पोलीस कर्मचारी यांचाही सहभाग आहे काय? मगरेवर यापूर्वीच्या काही गुन्हे दाखल आहेत काय? याचीही चौकशी करणार असल्याचे कराळे यांनी सांगितल़ेभूषण व पोलीस कॉन्स्टेबल सुशील मगरे रा़पहूर ता़जामनेर या दोघांना अटक केली़ यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून नाशिक येथून पथकाला गणेश उत्तम पाटील रा़ नेरी ता़जामनेर यास अटक केली़ त्याच्याकडून दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुस व 8 मोटारसायकल असा 4 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आह़े