जळगाव : सदैव जनतेच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या जळगाव जिल्हा पोलीस दलातील ३४ पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांना लोकमत आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे शुक्रवारी ‘शौर्य’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व ‘लोकमत’चे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी उपस्थित होते. प्रास्ताविक लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात वाचक शाखेचे सिद्धेश्वर आखेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हाभरातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
ही कौतुकाची थाप...
कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून पोलिसांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केला. लोकमतच्या पुरस्कारातून ही कौतुकाची थाप आहे. पुरस्कार मिळणे हा पोलीस दलाचा सन्मान आहे.
-अभिजित राऊत, जिल्हाधिकारी
कोरोनाकाळात पोलिसांनी कर्तव्यनिष्ठेची परीक्षा दिली. या कठीण परिस्थितीत सर्व पोलीस उभे राहिले त्यामुळे त्यांनी गुडविल कमविले.
- डॉ. प्रवीण मुढे, पोलीस अधीक्षक
पोलिसांना मानाचा मुजरा...
कोरोनाचे अभूतपूर्व संकट होते. संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली होती. या काळात जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी सेवा बजावली. या आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिसांना मानाचा मुजरा.
- प्रा.पी. पी. पाटील, कुलगुरू
कोरोना महामारीच्या संकटात संपूर्ण देश एकजुटीने लढत असताना या संकटात आपण स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देहभान विसरून या राष्ट्रीय कार्यात पोलीस बांधव अविरत सहभागी आहेत. अशा कठीण परिस्थितीत समाज हेच कुटुंब समजून आपली सामाजिक जबाबदारी निष्ठेने सांभाळणाऱ्या पोलीस बांधवांचा शौर्य पुरस्काराच्या माध्यमातून लोकमत व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे करण्यात आलेला सन्मान विधायक उपक्रम आहे.
- सुशीलकुमार बाफना, संचालक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स
असे आहेत ‘शौर्य’ पुरस्कारप्राप्त पोलीस
सिद्धेश्वर आखेगावकर (वाचक शाखा), मयूर भामरे (चाळीसगाव शहर पो.स्टे), रवींद्र गिरासे, संजय पवार, गोरखनाथ बागुल (स्थागुशा, जळगाव), अंगत नेमाणे (सायबर पो.स्टे), दिलीप पाटील, रवींद्र माळी, अल्ताफ सत्तार मन्सुरी (जिल्हा विशेष शाखा), अरुण राठोड, राजेश पाटील (जळगाव तालुका), संजय नाईक (शवाशा,जळगाव), तुकाराम निंबाळकर, ललित गवळे, (एमआयडीसी पो.स्टे), श्यामकांत पाटील (गृह डीवायएसपी कार्यालय, जळगाव), विजय माळी (पिंपळगाव हरेश्वर), विठ्ठल फुसे (भुसावळ तालुका), संदीप परदेशी (भुसावळ तालुका पो.स्टे), प्रशांत पाटील (चाळीसगाव शहर वाहतूक), शरद राजपूत (कासोदा पो.स्टे), अरुण पाटील (भडगाव पो.स्टे), प्रवीण पाटील (दहशतवादी विरोधी पथक, जळगाव), शांताराम पवार, (चाळीसगाव ग्रामीण), स्वप्निल पाटील (निंभोरा पो.स्टे), विजय कचरे (एसडीपीओ कार्यालय, मुक्ताईनगर), जितुसिंग परदेशी (पहूर पो.स्टे), भूषण माळी (नियंत्रण कक्ष,जळगाव), गणेश शेळके (वरणगाव पो.स्टे), शांताराम सोनवणे (मानव संसाधन विभाग), राकेश दुसाने (रामानंदनगर पो.स्टे), योगेश गोसावी (अडावद पो.स्टे), कमलेश पाटील (जळगाव शहर पो.स्टे), रवींद्र मोतीराया (एसडीपीओ कार्यालय, जळगाव).