यावल : विवाह समारंभातील गर्दीची माहिती लपविल्याच्या कारणावरून म्हैसवाडी, ता.यावल येथील महिला पोलीस पाटील प्रफुल्ला गोटुलाल चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी बुधवारी हे आदेश काढले आहेत.सद्य:स्थितीत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विवाह समारंभात पन्नासपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहू शकणार नाहीत, असा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे. तालुक्यातील म्हैसवाडी येथील मच्छिंद्र चौधरी यांचा मुलगा विक्की तर त्यांचा भाऊ जयसिंंग चौधरी यांचा मुलगा जितेंद्र असे दोन लग्न समारंभ ७ जून २०२० रोजी एकत्र पार पडले. यासाठी सुमारे ७० ते ८० जण उपस्थित होते. लग्न समारंभात कोरोनाविषयक कोणतीही सुरक्षितता पाळण्यात आलेली नव्हती. परिणामी गावातील १७ जण कोरोना बाधित झाले आहेत. ही बाब पोलीस यंत्रणेला माहीत पडली. त्यानंतर पोलीस पाटील प्रफुल्ला चौधरी यांच्याविरुद्ध २ जुलै रोजी संबंधितावर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस पाटील प्रफुल्ला चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी ८ जुलै रोजी प्रफुल्ला चौधरी यांना निलंबित केले आहे. या आदेशामुळे पोलीस पाटील वर्गात खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील पोलीस पाटील निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 8:34 PM
विवाह समारंभातील गर्दीची माहिती लपविल्याच्या कारणावरून म्हैसवाडी, ता.यावल येथील महिला पोलीस पाटील प्रफुल्ला गोटुलाल चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे.
ठळक मुद्देलग्नातील गर्दीची माहिती लपविलीविवाह समारंभास जादा लोकांची उपस्थिती भोवली