लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मेहरूण बगिच्यातील पडक्या गोडावूनच्या शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवार, १३ एप्रिल रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलीस पथकाने एकूण ४ लाख ६७ हजार रुपयांचे साहित्य जप्त करून अकरा जुगार खेळणा-यांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहरूण बगिच्यातील पडक्या गोडावूनच्या शेजारी जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मंगळवारी मिळाली. त्यांनी विशेष पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पथकाने छापा मारला. त्याठिकाणी ११ जण जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. त्यांना पोलिसांनी जागेवर पकडले.
रोकड, ९ मोबाइल व कार, दुचाकी जप्त
पोलिसांनी कारवाई दरम्यान अंगझडती घेतली. यावेळी त्यांच्याकडून १ लाख ५९ हजार ७३० रुपयांची रोकड मिळून आली. तर जुगाराचे साहित्य आढळून आले. त्याचबरोबर पोलिसांनी त्यांच्याकडून ८३ हजार रुपये किमतीचे ९ मोबाइल व एका कार व दुचाकी जप्त केली. असा एकूण ४ लाख ६७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
यांच्यावर गुन्हा दाखल
याप्रकरणी अमित मुरलीधर गोगीया (रा.सिंधी कॉलनी), संजय देवीदास देवरे (रा.दापोरा), अरुण भीमराव गोसावी (रा.तुकाराम वाडी), शेख सलिम शेख हुसेन (रा.पाळधी), सचिन दामू गवळी (रा.शनिपेठ), राहुल जीवन पांडे (रा.सुप्रीम कॉलनी), ताहीर अब्दुल शेख (रा.असोदा), कैलास गजमल गवळी (रा.तांबापुरा), विशांत किसन सोनी (रा.सत्यम पार्क), नितीन मुरलीधर वाणी (रा.भुसावळ), शुभम मोहन वारके (रा.भुसावळ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या विशेष पथकातील सहाय्यक फौजदार विनायक देसले, रवींद्र मोतीराया, अशोक फुसे, गोपाळ पाटील, प्रदीप काळगे, संतोष जाधव, सागर सूर्यवंशी, अमोल शिंदे, अभिषेक पिसाळ, हरीश शिंपी, प्रवीण लोहार, जीवन बंजारा, सचिन मुंढे आदींनी ही कारवाई केली आहे.