जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता आर.एल.चौकानजीक गणपती मंदिराच्या शेजारी सुरू असलेल्या सट्टा अड्यावर धाड टाकली. तेथे रवींद्र विश्वनाथ वाघ (रा.सदगुरु नगर) याच्या सांगण्यावरून सुधाकर भास्कर नारखेडे (५५,रा.सुनसगाव, ता.भुसावळ) हा सट्टा घेत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून ४३५ रुपये रोख व चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रौढाचा रुग्णालयात मृत्यू
जळगाव : कालंका माता मंदिराच्या पाठीमागे राहणाऱ्या प्रदीप वामनराव राख (वंजारी) ५४ यांचा बुधवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना २० रोजी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोपाळपुरातील वृद्धाचा मृत्यू
जळगाव : गोपाळपुरातील रामदास काशिनाथ खैरे (६९) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. नातेवाइकांनी मयत स्थितीत दाखल केले होते. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार रतीलाल पवार तपास करीत आहेत.
हरविलेल्या महिलेचा घेतला शोध
जळगाव : पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथील मूळ रहिवासी व सध्या स्वामी समर्थ कॉलनीत वास्तव्याला असलेली २० वर्षीय महिला तिच्या तीन महिन्याच्या बाळासह हरविली होती. तालुका पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला. पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी महिलेचे समुपदेशन करून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. १९ जानेवारी रोजी ही महिला हरविली होती.