भडगाव, जि.जळगाव, दि.25- नगरदेवळा स्टेशनजवळील उड्डाणपुलाजवळ असलेल्या आनंद गार्डनवर न्यायालयाच्या आदेशाचा भंग करीत दारु विक्री सुरु असल्याने सोमवारी रात्री साडेआठवाजेच्या सुमारास भडगाव पोलिसांनी छापा टाकुन विदेशी मद्य व बिअरच्या बाटल्या जप्त केल्या.
न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामागापार्सुन पाचशे मीटरपर्यत मद्य विक्री करण्यास बंदी आहे. मात्र चाळीसगाव रस्त्यावरील नगरदेवळा रेल्वे स्टेशनजवळील आनंद गार्डन या हॉटेलवर मद्य विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय परदेशी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक हॉटालवर छापा टाकला. त्यात विविध प्रकारच्या साधारण नऊ हजार रुपए किमतीचे मद्य आढळुन आली. पोलिसांनी या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.