लोकमत न्यूज नेटवर्कसावदा, दि.४ : पोलिसांनी शहरात एका ठिकाणी धाड टाकून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई ३ नोव्हेंबरच्या रात्री करण्यात आली.सावदा येथे अवैध दारू विक्री होत असल्याबाबत अनेक दिवसापासून तक्रार होती. अनेक ठिकाणी देशी व विदेशी दारू अद्यापदेखील भर रहदारीच्या ठकाणी सर्रास विकली जात होती. चर्मकार वाड्यात एका घराजवळ देशी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ३ रोजी रात्री ७ वाजेदरम्यान तपासणी केली असता सचिन उर्फ सत्या नामदेव ठोसर याच्या घराशेजारी देशी दारूचा माल ठेवलेला पोलिसांना आढळून आला.यावर कारवाई करीत पोलिसांनी सर्व माल जप्त केला व सचिन ठोसर याच्याविरूद्ध सावदा पोलीस ठाण्यात मुंबई दारुबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सावदा पोलीस ठाण्याचे ज्ञानेश्वर चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. तपास फौजदार मनोज खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश अढायगे व सहकारी करीत आहे.कारवाईत पोलिसांनी संजीवनी देशी दारुच्या १८० एमएलच्या बाटल्यांचे ५२ बॉक्स, किंमत सुमारे एक लाख ११ हजार रुपये व टेंगो देशी दारूच्या १८० एमएलच्या बाटल्यांचे ४० बॉक्स किंमत सुमारे ८६ हजार असा एकूण ९२ बॉक्स किंमत एक लाख ९७ हजार रुपये दारुसाठा जप्त करून ताब्यात घेण्यात आला.
सावदा येथे दोन लाखाचा मद्यसाठा जप्त करीत पोलिसांनी केली एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 5:51 PM
पोलिसांनी सावदा शहरात एका ठिकाणी धाड टाकून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला.
ठळक मुद्देसावदा येथे अवैध दारू विक्री होत असल्याची तक्रारपोलिसांनी दोन लाखांचा मद्यसाठा केला जप्तसंशयित आरोपीविरूद्ध सावदा पोलिसात गुन्हा