ठळक मुद्देचुंचाळे यथील घटना : दोन्ही कुटुंबांची एकमेकांविरुद्ध फिर्याद
लोकमत न्यूज नेटवर्कयावल/चुंचाळे : तालुक्यातील चुंचाळे येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी पोलीस कर्मचारी युवतीचा विनयभंग केल्याने युवकासह त्याच्या कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तर या घटनेमुळे युवकाचे घर जाळल्याची खळबळजनक घटना १८ रोजी घडली. याप्रकरणी युवतीच्या दोन नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे.या घटनेबाबत युवतीने दिलेल्या दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चुंचाळे येथील शरद अशोक पटील या युवकाशी सन २०१४ पासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तेव्हापासून तो तिचा मोबाईल चेक करण्यासाठी वारंवार मागतो. १८ जानेवारी रोजी दीड-पावणे दोन वाजेच्या सुमारास युवती तिच्या शेतात आईचा डबा घेवून जात असताना रस्त्यात शरदने तिला अडवून तिच्याशी अंगलट करीत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी युवकासह कुटुंबातील स्वप्नील पाटील तसेच महिला अशा एकूण सातजणांविरूध्द जातीवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग करणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपुर उपविभागीय पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पिंगळे, हे. कॉ. संजय तायडे तपास करीत आहेत.याचबरोबर युवकाच्या आजीने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सदर पोलीस युवतीशी नातू शरद पाटील याचे प्रेमसबंध आहेत. सोमवारी नातीचे लग्ननात पंगती सुरू असतांना नातवाशी मुलीच्या कुटूंबियाशी झालेल्या वादामुळे युवतीचे वडील, भाऊ यांनी शिवीगाळ करीत इतरांसह घरात घुसत साहित्यावर पेट्रोल टाकून आग लावली. यामुळे घरातील सुमारे तीन लाख रुपयाचे साहित्य जळाले आहे. यातील युवतीच्या वडील आणि भावास अटक केली असून न्यायालयातन्हजर केले असता २५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे.पो. नि. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जितेंद्र खैरनार पुढील तपास करीत आहेत.पोलीस युवतीचा विनयभंग केल्याने युवकाचे घर पेटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 10:58 PM