जळगाव : मागणीनुसार पाहिजे त्या ठिकाणी पदोन्नती मिळत नसल्याने जि.प. मध्ये आलेल्या शिक्षकांनी पदोन्नती नाकारल्याने गोंधळ उडाल्याचा प्रकार शनिवारी जळगाव येथे घडला. या वेळी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला.आधी पदोन्नती करा आणि मग बदली प्रक्रिया राबवावी या मागणीवरून शिक्षक व संघटनांनी बहिष्काराचा इशारा दिल्यानंतर शुक्रवारची समुूपदेशन प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली होती. शिक्षकांच्या मागणीनुसार आता शनिवारी आधी पदोन्नती व त्यांनतर शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. या वेळी आलेल्या १०० पैकी ८८ शिक्षकांनी पदोन्नती नाकारली.आॅनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर यात ६६ शिक्षक विस्थापित झाले होते़ या विस्थापीत शिक्षकांना समुपदेशनासाठी शुक्रवार २७ जून रोजी बोलावण्यात आले होते़ मात्र, आधी पदोन्नत्या न करण्यात आल्याने जागा रिक्त झालेल्या नसल्याने आमच्यावर विस्थापित होण्याची वेळ आल्याचे सांगत या समुपदेशन प्रक्रियेवर ६६ शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला होता़ त्यांनी यासंदर्भात जि़ प़ अध्यक्षा उज्ज्वला पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांची भेट घेतली होती़ त्यानंतर सीईओंनी यासंदर्भात तत्काळ पदोन्नत्यां संदर्भात कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार बैठका होऊन, अखेर शनिवारी सकाळी पदोन्नत्यांची प्रक्रियेस सुरुवात झाली.
शिक्षक पदोन्नती प्रक्रियेदरम्यान गोंधळ, जळगाव जि.प.मध्ये पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 1:13 PM