फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : पोलिसांना काम करण्याची खूप मोठी संधी आहे. आपले कार्यक्षेत्र रुंदावत जनतेमध्ये सुसंवाद साधत विश्वास निर्माण करावा. तसेच गुन्ह्यांचे प्रमाण कसे कमी होईल व घडलेल्या गुन्ह्यांचा तपास कसा जलद गतीने लागेल याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी येथे ‘पोलीस दरबारा’त केले.फैजपूर येथील उपविभागीय पोलीस उपविभाग कार्यालय अंतर्गत असलेल्या फैजपूर, निंभोरा व रावेर या तिन्ही पोलीस ठाण्यांचे अधिकारी व सुमारे पन्नासावर पोलीस कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याकडून डॉ.उगले यांनी आढावा घेतला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या.पोलिसांशी संवाद साधून पोलीस कर्मचाºयांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात दरबार घेऊन पोलिसांकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन या पोलीस ठाण्यांंतर्गत कामकाजाविषयी सूचना देवून मार्गदर्शन केले. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कामाचा आढावा घेऊन समस्या जाणून घेऊन त्यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले.यावेळी फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, फैजपूर पोलीस ठाण्याचे एपीआय दत्तात्रय निकम, सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह फैजपूर, निंभोरा व रावेर या तिन्ही पोलीस ठाण्यांचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान, यानंतर फैजपूर शहरातील पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांंचा सामूहिक सत्कार केला. यावेळी डॉ.उगले यांनी पत्रकारांशी संवाद साधून या भागातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीविषयी माहिती घेतली.यावेळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे, कार्याध्यक्ष वासुदेव सरोदे, सचिव प्रा.उमाकांत पाटिल, अरुण होले, नीलेश पाटील, मयूर मेढे, सलीम पिंजारी, राजू तडवी, समीर तडवी सामाजिक कार्यकर्ते इकबाल शेख हुसेन उपस्थित होते.
पोलिसांनी गुन्ह्यांचे प्रमाण कमी कसे होईल याकडे लक्ष केंद्रित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:16 PM
पोलिसांना काम करण्याची खूप मोठी संधी आहे. आपले कार्यक्षेत्र रुंदावत जनतेमध्ये सुसंवाद साधत विश्वास निर्माण करावा. तसेच गुन्ह्यांचे प्रमाण कसे कमी होईल व घडलेल्या गुन्ह्यांचा तपास कसा जलद गतीने लागेल याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी येथे ‘पोलीस दरबारा’त केले.
ठळक मुद्देफैजपूर येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला पोलीस दरबारजाणून घेतल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडीअचणी