जळगाव : ड्युटी लावताना त्रास दिला जात असल्यामुळे श्रध्दा अर्जुन आहेर (वय ३१, रा.दक्षता पोलीस लाईन,जळगाव) या महिला पोलीस कर्मचाऱ्याने झोपेच्या गोळ्या सेवन करुन तालुका पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गोळ्या सेवन करण्यापूर्वी श्रध्दा यांनी त्रास देणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या नावाने चिठ्ठी लिहिली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, श्रध्दा आहेर या तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. रविवारी त्यांची दुपारी २ ते रात्री ८ अशी ड्युटी होती. गेल्या काही दिवसापासून हजेरी मास्तर अमीर तडवी हे गैरसोयीची ड्युटी लावत आहेत.कुटुंबात कोणीतरी आजारी असल्याने गैरसोयीची ड्युटी लावू नका म्हणून त्यांनी हजेरी मास्तर व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना विनंती केली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. मर्जीतल्या कर्मचाºयांना सोयीची ड्युटी लावली जाते व इतर कर्मचाºयांना त्रास देण्याच्या हेतून गैरसोयीची ड्युटी लावली जाते असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले असून त्याच निरीक्षक दिलीप भागवत, हजेरी मास्तर अमीर तडवी, उमेश भांडारकर, महिला कर्मचारी दुसाने व धनके यांचेही नावे चिठ्ठीत आहेत.माझ्या मरणाला हेच चार जण जबाबदार आहेत, असे त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या नावाने म्हटले आहे. पती योगेश सोनवणे यांच्या नावाचाही उल्लेख असून स्वत: व मुलांची काळजी घेण्यासह त्यांचे शिक्षण चांगले करा असा उल्लेख आहे.अधिकारी, कर्मचाºयांची धावपळघटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, उपनिरीक्षक कदीर तडवी यांच्यासह तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. श्रध्दा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नेमके कोणाचे नाव आहे व त्यात काय उल्लेख आहे याबाबत कर्मचाºयांकडून माहिती काढण्याचे काम सुरु होते.आॅन ड्युटीच घेतल्या गोळ्याश्रध्दा यांनी ड्युटी संपण्याच्या आधीच झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यामुळे त्यांना काही वेळाने अस्वस्थ वाटू लागले. पतीला त्यांनी बोलावून घेतले. मात्र प्रकृती खालावल्यामुळे पोलीस वाहनातून त्यांना घरी सोडण्यात आले. घरी आल्यावर आणखीन प्रकृती बिघडल्याने पती व इतर नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी तातडीने उपचार केले असता श्रध्दा यांनी मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या सेवन केल्याचे स्पष्ट झाले. रात्री साडे अकरा वाजता त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ.बिराजदार यांनी ‘लोकमत’ ला दिली.
पोलीस ठाण्यातच महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:10 AM
हजेरी मास्तरचा जाच
ठळक मुद्देचार जणांच्या नावाने लिहिली चिठ्ठी