धुळे : वादविवाद करणा:यास हटकल्याच्या कारणावरून पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करत त्यांच्यावर तलवार उगारल्याची घटना शनिवारी रात्री शिरपुरात घडली़ याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून दोन फरार झाले आहेत़ याप्रकरणी पोलिसांनी स्वपिAल छत्रपती राजपुत (रा़ दहिवद), मनोज पदमसिंग राजपुत (रा़ सुळे) व हितेश प्रविणसिंग राजपुत (रा़ करवंद नाका) या तिघांना ताब्यात घेतले आह़े तर शिवा राजपुत (रा़ दहिवद) व योगेश ईश्वर राजपुत (रा़ आमोदे ता़ शिरपूर) हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत़ शिरपूरातील बसस्थानकासमोर शनिवारी रात्री 10़20 वाजेच्या सुमारास पाच जण आप- आपसात हुज्जत घालत होते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर यांनी त्यांना हटकल़े त्यावरून स्वपिAल, मनोज, हितेश , शिवा व योगेश यांनी त्यांना शिवीगाळ करून तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली़ यावेळी शिवा राजपूत याने हातातील खुली तलवार काढून उगारली. याबाबत मुकेश गुजर यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े त्यावरून पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शिरपूर येथे शनिवारी काढलेल्या मिरवणुकीत तलवार उंचावून नाचताना अंकित एकनाथसिंग देशमुख (रा़ आमोदे, ता़ शिरपूर) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल़े त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीची साडेतीन फुटी तलवार हस्तगत करण्यात आली आह़े याप्रकरणी अंकितविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
पोलीस उपनिरीक्षकावर शिरपुरात तलवार उगारली
By admin | Published: May 29, 2017 1:00 AM