शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

जळगावात पोलीस अधीक्षक कार्यालयानजीकच्या निवासस्थानातील २ पोलीस अधिकाऱ्यांची घरे चोरट्यांनी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:58 PM

लाखाचा ऐवज लांबविला

ठळक मुद्देचोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हाने‘तापी’ इमारतीतील घटना

जळगाव : आतापर्यंत सर्वसामान्य जनता, नोकरदार व डॉक्टरांची घरे फोडणाºया चोरट्यांनी आता पोलीस अधिकाºयांच्याच घरी घरफोड्या करुन पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अगदी भींतीला लागूनच असलेल्या पोलीस अधिकाºयांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘तापी’या इमारतीत राहणाºया महिला उपनिरीक्षक दीक्षा चंपतराव लोकडे यांच्या घराचे कुलूप तोडून ७३ हजाराचा तर सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांच्या उघड्या घरातून २६ हजाराचा ऐवज लांबविल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला.एका तरुणावर संशयदोन्ही पोलीस अधिकाºयांकडे झालेल्या चोरी व घरफोडीबाबत एका तरुणावर संशय व्यक्त केला आहे. या तरुणाला दोन्ही पोलीस अधिकाºयांच्या निवासस्थानाकडे वावरताना अनेकांनी पाहिले आहे. विशेष म्हणजे हा चोरटा ओळखीतीलच असल्याचेही चर्चा आहे. त्यामुळे चोरटा शोधून काढणे आता पोलिसांसमोर एक आव्हान उभे ठाकले आहे.दागिने व रोकड लंपासदीक्षा लोकडे या रविवारी रात्री साडे बारा वाजता शहरात दाखल झाल्या. त्यांनी घरात पाहणी केली असता घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप बेडवर ठेवलेले होते तर कपाटाच्या ड्रावरचे लॉक तुटलेले होते.त्यात ठेवलेले २५ हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पीळ, २५ हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची अंगठी, २० हजार रुपये किमतीची ८ ग्रॅमची हार्ट शेप व अडीच हजार रुपये रोख असा ७२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लांबविण्यात आला होता.पुणे येथे प्रशिक्षणाला गेल्या अन् चोरट्यांनी संधी साधलीशहर पोलीस स्टेशनला तीन महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या दीक्षा लोकडे (वय ३२, मुळ रा.नांदेड) या पोलीस अधीक्षक कार्यालयाला लागून असलेल्या तापी इमारतीत खोली क्र. ६ मध्ये वास्तव्याला आहेत. महाराष्टÑ इंटेलिजस अकादमी, पुणे येथे इंट्रोगेशन टेकनिक्स कोर्ससाठी दीक्षा यांची निवड झाल्याने २६ नोव्हेंबर रोजी रात्री घराला कुलूप लावून त्या पुणे येथे गेल्या होत्या. १ डिसेंबर रोजी प्रशिक्षणसंपल्यानंतर त्या परस्पर तेथून सासरी हिंगोली येथे गेल्या. रविवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शेजारी राहणारे सहायक निरीक्षक गांगुर्डे यांना दीक्षा यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला व घरातील सामानही अस्ताव्यस्त होता. कपाटही उघडे होते. त्यांनी लागलीच हा प्रकार दीक्षा यांना मोबाईलवरुन सांगितला.सहायक निरीक्षकाच्या घरातून लांबविले २० हजार व मोबाईलस्थानिक गुन्हे शाखेला कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर हे देखील याच तापी इमारतीत खोली क्रमांक ४ मध्ये वास्तव्याला आहेत. २६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरातील टेबलच्या ड्रावरमधून २० हजार रुपये रोख व ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला आहे. दीक्षा लोकडेसह होळकर यांनीही सोमवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली.गुन्हा दाखल करण्याबाबत संभ्रमावस्थाघरफोडी व चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर उपनिरीक्षक दीक्षा लोकडे व सहायक निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी सोमवारी दोन वेळा जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. फिर्यादही दिली, मात्र गुन्हा दाखल करण्याबाबत रात्री उशिरापर्यंतही एकमत झाले नव्हते. त्यामुळे संभ्रमावस्था कायम होती.अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर घडफोडीपोलीस अधिकाºयांचे निवासस्थान अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर व सतत पोलिसांचाच वावर असलेल्या ठिकाणी आहे. असे असतानाही अशा ठिकाणी घरफोडी होणे व तेदखील पोलिसांच्याच घरी म्हणजे आश्चर्यच आहे. काही महिन्यापूर्वी याच जागेपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या डॉ. नरेंद्र दोशी यांच्या बंगल्यातही भरदिवसा दरोडा पडला होता. त्यानंतर आता ही घटना घडली.सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत...सामान्य नागरिकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा सल्ला देणाºया पोलीस अधिकाºयांच्याच इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पोलीस अधिकारी असल्याने चोरटे आपल्या घरात शिरणार नाहीत असा समज या घटनेने खोटा ठरविला आहे. दरम्यान, बहुतांश पोलीस अधिकारी ड्युटीवर असताना त्यांना दिलेले सरकारी रिव्हॉल्वर घरीच असते, त्यामुळे भविष्यात त्याची चोरी होणार नाही याची शाश्वती काय? असा प्रश्न खुद्द पोलीस अधिकाºयांनाच पडला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव