लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा वाढता ससंर्ग लक्षात घेता शासनाने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. हळूहळू निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील ताण पुन्हा वाढला आहे. आतापर्यंत जिल्हा पोलीस दलातील ८ पोलिसांचा कोरोनाने बळी घेतला आहे.अजूनही ६०७ पोलीस बाधित असून सात जणांवर उपचार सुरू आहेत. जवळपास ८० टक्के अधिकारी, कर्मचारी यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर ५५ टक्के कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तर पोलीस दादा २४ तास रस्त्यावर उभा आहे. ना उन्हाची पर्वा ना भूकेची तशीच ड्युटी करीत आहे. सर्वच बंद असल्याने तडपत्या उन्हात तहान लागल्यावर पाणी देखील वेळेवर प्यायला मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पहिला डोस
एकूण अधिकारी : १९६
एकूण कर्मचारी : ३२२३
डोस घेतलेले अधिकारी : १८३
डोस घेतलेले कर्मचारी : ३०२०
वैद्यकीय करणाने नकार अधिकारी : १३
वैद्यकीय करणाने नकार कर्मचारी : २०२
दुसरा डोस
डोस घेतलेले अधिकारी : १३३
डोस घेतलेले कर्मचारी : १८९२
वैद्यकीय करणाने नकार अधिकारी, कर्मचारी : ११
२) ६०७ पोलीस पॉझिटिव्ह (ग्राफ)
एकूण कोरोनाबधित पोलीस -६०७
उपचार सुरू असलेले पोलीस - ७
एकूण कोरोनाबधित पोलीस अधिकारी -६४
सध्या उपचार सुरू असलेले पोलीस अधिकारी -१
मृत्यू -८