आॅनलाईन लोकमतजळगावदि,२६ : अपघात झाल्यानंतर त्याचा तपास करुन सर्व इत्यंभूत कागदपत्रांसह वस्तुनिष्ट अहवाल पाठविण्याची जबाबदारी पोलिसांचीच असल्याच्या सूचना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी केल्या. एखाद्या त्रुटीमुळे अपघातात जखमी अथवा मृत व्यक्तीचा दावा नाकारला जातो ही वेळ येवू नये असेही त्या म्हणाल्या. पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा विधी सेवा प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मंगलम सभागृहात 'मोटार अपघातातील दावे' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना न्या.बारणे यांनी विविध मुद्यांना स्पर्श केला. यावेळी न्या.ज्योती दरेकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, उपअधीक्षक सचिन सांगळे, परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्यासह शहरातील सर्व प्रभारी अधिकारी व जिल्ह्यातील दुय्यम अधिकारी तसेच मोटार अपघात प्रकरणातील अमलदार उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी आभार मानले.
अपघाताच्या घटनेत वस्तुनिष्ट अहवाल पाठविण्याची जबाबदारी पोलिसांचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 9:48 PM
अपघात झाल्यानंतर त्याचा तपास करुन सर्व इत्यंभूत कागदपत्रांसह वस्तुनिष्ट अहवाल पाठविण्याची जबाबदारी पोलिसांचीच असल्याच्या सूचना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी केल्या. एखाद्या त्रुटीमुळे अपघातात जखमी अथवा मृत व्यक्तीचा दावा नाकारला जातो ही वेळ येवू नये असेही त्या म्हणाल्या.
ठळक मुद्देन्यायाधीश सविता बारणे यांच्या सूचनाजळगावात अपघात दाव्याबाबत पोलिसांसाठी कार्यशाळा अपघातातील जखमी व मृताच्या वारसाला मदत मिळावी