शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

मतदार संघ पुनर्रचनेमुळे बदलली राजकीय समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:26 AM

२०१९ च्या लोकसभेच्या वेळीदेखील २००९ च्या पुनर्रचनेनुसार निवडणुका होत आहेत.

जळगाव/रावेर/धुळे/नंदुरबार : भारत मर्यादीकरण आयोग (डी लिमिटेशन कमिशन) च्या शिफारशीनंतर २००९ मध्ये मतदार संघांची पुनर्रचना होऊन मतदार संघांमध्ये काही बदल झाले. या बदलाचे परिणाम अनेकांच्या राजकीय कारकिर्दीवर झाले तर नव्या रचनेमुळे अनेकांची अद्यापही दमछाक होत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.एरंडोल लोकसभा मतदार संघ झाला जळगावजिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघाचे नाव पूर्वी एरंडोल लोकसभा मतदार संघ असे होते. २००९ मध्ये भारत मर्यादीकरण आयोग (डी लिमिटेशन कमिशन) च्या शिफारशीनंतर मतदार संघांची पुनर्रचना होऊन मतदार संघांमध्ये काही बदल झाले.जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदार संघ अनेक वर्षांपासून आहेत. दर दहा वर्षानंतर जनगणना झाल्यानंतर मतदार संघांची पुनर्रचना होणे अपेक्षित असते. त्यानुसार भारत मर्यादीकरण आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार २००९ च्या म्हणजे पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी पुनर्रचित मतदार संघांच्या रचनेनुसार निवडणुका झाल्या होत्या. २००९ नंतर २०१४ म्हणजे सोळाव्या लोकसभेच्या वेळी व त्यानंतर सतराव्या म्हणजे २०१९ च्या लोकसभेच्या वेळीदेखील २००९ च्या पुनर्रचनेनुसार निवडणुका होत आहेत.एरंडोल ते जळगाव असे झाले बदलपूर्वीच्या एरंडोल लोकसभा मतदार संघात एरंडोल,पारोळा-भडगाव, पाचोरा,चाळीसगाव, अमळनेर व चोपडा असे सहा विधानसभा मतदार संघ होते. पुनर्रचनेनंतर २००९ पासून एरंडोल लोकसभा मतदार संघाचे नाव जळगाव लोकसभा मतदार संघ असे झाले. या मतदार संघात जळगाव शहर, जळगाव ग्रामिण, अमळनेर, पारोळा- एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा या विधानसभा मतदार संघांचा समावेश झाला. या मतदार संघातील पूर्वीच्या पारोळा-भडगाव मतदार संघातील भडगाव तालुका हा पाचोरा तालुक्याला जोडला गेला तर या तालुक्यातील अमडदे-गिरड जि.प.गट हा एरंडोल मतदार संघात समाविष्ट झाला.असा झाला रावेर लोकसभा मतदार संघपूर्वीचा भुसावल लोकसभा मतदार संघाचे पहिले खासदार म्हणून काँग्रेसचे शिवराम रंगो राणे आणि आताच्या रावेर लोकसभा मतदार संघाचे पहिले खासदार म्हणून हरिभाऊ जावळे यांना मान मिळाला आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघाने सातत्याने लेवा समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. १९५२ मध्ये पूर्व खान्देश व भुसावळ लोकसभा मतदार संघ होते. भुसावळ लोकसभा मतदार संघाचे सन १९७७ मध्ये जळगाव लोकसभा मतदार संघ असे नामकरण झाले. त्यानंतर २००८ पर्यंत हा मतदार संघ अस्तित्वात राहिला. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुनर्रचित मतदार संघाचे विभाजन करण्यात आले. पूर्वीचा एरंडोल लोकसभा मतदार संघ नवीन रचनेप्रमाणे जळगाव झाला तर जळगाव लोकसभा मतदार संघाचे नाव हे रावेर लोकसभा झाले.या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेशया मतदारसंघात चोपडा व विदर्भातील मलकापूर या दोन नवीन मतदार संघाचा समावेश करण्यात आला. यासह मुक्ताईनगर, रावेर- यावल, जामनेर व भुसावळ या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश रावेर लोकसभा मतदार संघात झाला आहे.४० वर्षात तीन वेळा मतदार संघाची पुनर्रचनानंदुरबार - लोकसभा निवडणुकीसाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ खान्देशातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाची गेल्या ४० वर्षात तिसऱ्यांदा पुनर्रचना करण्यात आली. १९७७ पूर्वी या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र वेगळे होते. त्यानंतर १९७७ ला पुनर्रचना होऊन त्यात नंदुरबार, नवापूर, अक्राणी, शहादा-दोंडाईचा, साक्री मतदारसंघाचा अर्धा भाग व शिरपूर मतदारसंघ असा होता. पुन्हा परिसिमन आयोगाचा आदेश क्रमांक २६ नुसार ३१ जुलै २००६ ला त्याची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेत विधानसभा मतदारसंघातील रचनाही बदलली होती. त्यात विशेषत: अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री व शिरपूर अशा सहा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र घेण्यात आले. या पुनर्रचनेत शिंदखेडा तालुक्यातील भाग वगळला गेला तर साक्री तालुक्यातील कार्यक्षेत्र वाढले.धुळे लोकसभा मतदारसंघात असे झाले बदलपूर्वी - या मतदारसंघात धुळे, कुसुंबा, शिंदखेडा, साक्री, सटाणा व कळवण या विधानसभा क्षेत्रांचा समावेश होता. आता - या मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, बागलाण, मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या सहा विधानसभा क्षेत्रांसह साक्री विधानसभा क्षेत्राच्या काही भागाचा समावेश आहे.पुनर्रचनेनंतर मतदार संघ झाला खुलाधुळे - भारत निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे दर १० वर्षांनी जनगणनेनंतर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येते. त्यानुसार धुळे लोकसभा मतदारसंघाची २००९ साली पुनर्रचना करण्यात आली. तसेच तो सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला.पूर्वी या मतदारसंघात धुळे, कुसुंबा, शिंदखेडा, साक्री, सटाणा व कळवण या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. पुनर्रचनेनंतर आता या मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, बागलाण, मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या सहा विधानसभा क्षेत्रांसह तसेच साक्री विधानसभा क्षेत्राचा भाग यांचा समावेश आहे.पूर्वी धुळे तालुक्यात असलेल्या कुसुंबा विधानसभा क्षेत्राचे नाव या पुनर्रचनेवेळी धुळे ग्रामीण असे करण्यात आले. पूर्वी हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गासाठी राखीव होता. परंतु २००९ मध्ये पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव सोनवणे या मतदारसंघातून निवडून आले होते.

टॅग्स :Politicsराजकारण