शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

राजकीय दबावात झुकली ‘खाकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:31 PM

ललित कोल्हे यांच्या फार्महाऊसवरील पार्टी : २४ संशयितांना दंड

ठळक मुद्देफार्महाऊसवर अलिशान जुगार अड्डान्यायालय म्हणाले, गुन्हा कबुल आहे का?

जळगाव : भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या ममुराबाद येथील फार्महाऊसवर महिलांचे बिभत्स नृत्य व दारु पार्टी करताना पकडण्यात आलेल्या २४ जणांच्या सुटकेसाठी राजकीय दबाबाखाली खाकी झुकल्याची जोरदार टीका होत आहे. यातील सहा युवती व १८ पुरुष अशा २४ जणांना बुधवारी न्या. डी.बी.साठे यांनी प्रत्येकी एक हजाराचा दंडाचा ठोठावून सुटका केली.सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी सोमवारी रात्री ममुराबाद रस्त्यावरील शेतातील भाजपा नगरसेवक ललित कोल्हे यांच्याफार्महाऊसवर धाड टाकली होती. त्यात सहा तरुणींसह २४ जणांना पकडून तालुका पोलीस स्टेशनला आणले. मंगळवारी या सर्वांना बारा वाजता न्यायालयात आणले.मात्र अचानक राजकीय हालचाली गतिमान होऊन या सर्वांना न्यायालयातून पुन्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दाखल गुन्हा रद्द करुन केवळ ११०, ११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने पोलिसांवर सर्व क्षेत्रातून टीका होऊ लागली.सर्व संशयितांना सकाळी ११ वाजता जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. यात सहा तरूणींचा सहभाग होता. तांत्रिक दुरूस्तीसाठी बराच कालावधी लागला. दुपारी साडेचार पर्यंत सर्व संशयित या ठिकाणी होते. त्यांच्या समर्थकांचीही येथे गर्दी होती.असे आहेत पकडलेले संशयितदिलीप शालीग्राम पाटील ( ५४, रा.पाळधी, ता.धरणगाव), तरुण नंदलाल रंगलाणी (४३, रा.सानेगुरुजी कॉलनी, जळगाव), भारत राजकुमार तलरेजा (३२, रा.सिंधी कॉलनी, जळगाव), मुन्ना वाह्या बारेला (३५, रा.ममुराबाद, ता.जळगाव), नितीन अशोक वाणी (३२, रा.मोहन नगर, जळगाव), लाला वाह्या बारेला (२२, रा.ममुराबाद), नाना वाह्या बारेला ( २३, रा.ममुराबाद), सरफराज मीनहाज शेख ( रा.मास्टर कॉलनी, जळगाव), विशाल ओमप्रकाश वर्मा (३८, रा.नवीन बी.जे.मार्केट, जळगाव), प्रवीण सोनमल जैन ( रा.बळीराम पेठ, जळगाव), राजेश गोविंदा माहेश्वरी ( रा.एमआयडीसी, जळगाव), कमलाकर तुकाराम बनसोडे (४०, रा.रथ चौक, जळगाव), चंद्रकांत राजाराम खडके (५२,रा. विठ्ठलपेठ, जळगाव), प्रशांत विश्वनाथ अग्रवाल (३७, रा.सराफ बाजार, जळगाव), दिलीप दीपक रंगलानी (३१, रा. सानेगुरुजी कॉलनी, जळगाव), करीम खा अय्युब खान (२८, रा.बºहाणपुर, मध्य प्रदेश), गिरीश प्रकाश लाहोरी (३४, सिंधी कॉलनी) व सैय्यन नावेद सैय्यद मतीन (२६, रा.बºहाणपुर, मध्यप्रदेश)या शेताशी आमचा काहीही संबध नाही. संबधित फार्म हाऊस राजेश मुंदडा यांना काही वर्षांपासून भाड्याने देण्यात आले आहे.-ललित कोल्हे, मनपा सभागृह नेतेनिष्पक्षपणे कारवाई झालेली आहे. पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. जे कायद्याच्या तरतूदीत आहे तेच केलेले आहे. कारवाईसाठी गेलेल्या पथकाला जे आढळले त्यावरुन कारवाई केली व संबंधितांना ताब्यात घेतले. राजकीय दबाव सहन करणार नाही.-दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, जळगाव.दिग्गजांना वगळलेसूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर राजकीय, व्यापार व उद्योग क्षेत्रातील दिग्गजांना पकडण्यात आले होते. त्यांना जागेवरच सोडून देण्यात आले तर काही जणांना पोलीस ठाण्यात सोडून देण्यात आले. खाद्य उत्पादन क्षेत्रातील नामवंत व्यक्ती व बांधकाम क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीचा यात समावेश आहे. राज्यस्तरीय बड्या व्यक्तीचा फोन आल्यानंतर घटनास्थळावरच त्यांना सोडून देण्यात आल्याचीही चर्चा आहे.न्यायालय म्हणाले, गुन्हा कबुल आहे का?२४ संशयितांना न्या.डी.बी.साठे यांच्यासमोर हजर करण्यात आले. प्रारंभी सहा तरुणींना व नंतर पुरुषांना हजर करण्यात आले. या सर्वांना न्यायालयाने तुम्हाला गुन्हा कबुल आहे का? अशी विचारणा केली असता सर्वांनी होकार दिला. त्यानंतर न्यायालयाने प्रत्येकाला एक हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. अ‍ॅड.प्रदीप देशमुख यांनी संशयितांच्यावतीने काम पाहिले. बुधवारी देखील राजकीय व्यक्ती व त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात न्यायालयात आले होते.फार्महाऊसवर अलिशान जुगार अड्डाममुराबाद रस्त्यावरील फार्महाऊस वातानुकुलित असून दोन मजली आहे. त्याला बंगल्याचा लूक देण्यात आला आहे. त्या ठिकाणी जुगाफार्महाऊसवर अलिशान जुगार अड्डार चालतो. आठवड्यातून तीनच दिवस येथे जुगार चालतो. त्यानंतर चार दिवस येथील जुगारी चोपडा येथे जातात. चार दिवस चोपडा व तीन दिवस जळगाव असे जुगाराचे वेळापत्रक आहे. जुगारी नेहमीचेच दिग्गज आहेत. त्यांच्यासेवेसाठी आतमध्येच कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जागेवरच मांसाहारी जेवण व दारुची व्यवस्था केली जाते. त्यासाठी स्वतंत्र फ्रिज व किचनची व्यवस्था आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता या फार्महाऊसवर भर पडली ती नर्तिकांची. आखाजीच्या काळात हा जुगार अधीकच बहरतो. ‘लोकमत’ने काही महिन्यापूर्वी या फार्महाऊसवर स्टींग आॅपरेशनही केले होते.कोणाच्या दबावाखाली यंत्रणा झुकली?अवैध धंदे व गैरप्रकार रोखण्यासाठी आपला वैयक्तीक मोबाईल क्रमांक तसेच हेल्पलाईन सुरु करुन जनतेला आवाहन करणाऱ्या अधिकाºयांनी राजकारण्यांपुढे एक प्रकारे मुजरा केल्याची चर्चा आहे. हातगाडीवर मद्यप्राशन, ढाब्यांवर मद्यविक्री किंवा मद्यप्राशन करणाºया सामान्याविरुध्द गुन्हा दाखल करुन थेट कोठडीत टाकल्याचे प्रकार अलीकडच्या काळात झाले. मग विना परवाना बिभत्स नृत्य, मुजरा व दारु पार्टी करणाºयांवर साधी प्रतिबंधात्मक कारवाई का?, एकाला एक व दुसºयाला वेगळा न्याय अशी भूमिका पोलिसांना का घ्यावी लागली?, कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा झुकली.एखादी अधिकारी प्रामाणिकपणे काम करीत असेल व त्यांच्यावर अशा पध्दतीने दबाव आणला जात असेल तर यंत्रणा कशी काम करेल अशीही दुसरी बाजू पुढे येत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी