शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

महापालिकांपुढे राजकीय पेचप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:11 AM

राज्यातील सत्ता परिवर्तनाने जळगाव, धुळे महापालिकेतील भाजपच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची कसोटी, निधी, कामे, गैरव्यवहार या मुद्यावरुन शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते करतील कोंडी

मिलिंद कुलकर्णी‘शतप्रतिशत भाजप’चे अभियान राबवित असताना स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपने संघटनात्मक बाबींवर जोर देण्याऐवजी ‘शॉर्ट कट’ वापरत इतर पक्षांमधील प्रभावशाली, वजनदार नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, जळगाव, धुळे अशा महापालिकांवर याच पध्दतीने भाजपने यश मिळविले. केंद्र व राज्यात सरकार आहे, महापालिकेत द्या, वर्षभरात विकास करुन दाखवतो हे आवाहन जनतेला भावले. आता मात्र राज्यात परिवर्तन झाल्याने भाजपशासीत महापालिका पदाधिकाऱ्यांपुढे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे.राजकारणातील अनिश्चितता गेल्या महिनाभरात संपूर्ण महाराष्टÑाने अनुभवली. मोदींचा करिष्मा, फडणवीस यांच्यासारखा प्रामाणिक चेहरा, गतिमान प्रशासन या जमेच्या बाजू ठासून सांगत आता ५० वर्षे भाजप सत्ता सोडत नाही, असे म्हटले जात होते. पण, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजकीय शहाणपण, मुत्सद्देगिरीत कमी पडलेल्या भाजपला थेट विरोधी बाकावर तर बसावे लागले, पण औटघटकेच्या राज्याने पुरते हसे केले. वयाच्या चाळीशीत पदार्पण करणाºया भाजपला ‘शायनिंग इंडिया’ चा फुगा फुटल्यानंतर हा दुसरा मोठा पराभव पत्करावा लागत आहे.संघटनकार्य, शिस्त, विचारप्रणाली हे भाजपचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य असताना भावनिक मुद्दे आणि घाऊक पक्षांतराच्या बळावर ‘शतप्रतिशत’ साठी अभियान उघडण्यात आले. केंद्र व राज्यातील सत्तेमुळे लाभार्र्थींची गर्दी पक्षात होऊ लागली. त्यांच्या गर्दीमुळे पक्षबळ वाढल्याचा साक्षात्कार तमाम संघटनमंत्री आणि पदाधिकाºयांना झाला. मूळ संघटनकार्य बाजूला पडून केवळ निवडणुकीच्या राजकारणावर भर दिला गेला. संस्था तर ताब्यात आल्या, पण त्या ‘परक्यां’च्या बळावर हे विसरले गेले. ‘परकीय आक्रमणा’मुळे निष्ठावंत कार्यकर्ते बिथरले. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला. जळगाव जिल्हा हा बालेकिल्ला असताना संख्याबळ घटले. धुळे, नंदुरबारमध्ये विद्यमान आमदारांना डावलले गेले, सेनेशी दगाफटका केल्याचा ठपका आला आणि संख्याबळ जैसे थेच राहिले.राज्यात ‘महाविकास आघाडी’ची स्थापना करताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा भाजपविरोध किती टोकाचा होता, हे आपण बघीतले. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटल्याशिवाय राहणार नाही. नंदुरबार, धुळ्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहे. धरणगावात लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद तर पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकांमध्ये नवीन समीकरणे उदयाला येऊ शकतात.सेना आणि राष्टÑवादीच्या नगरसेवकांच्या बळावर भाजपने जळगाव आणि धुळे महापालिकेत सत्ता हस्तगत केली. परंतु, आता सत्ता परिवर्तनानंतर या नगरसेवकांना घरवासपीचे वेध लागण्याची शक्यता आहे. जळगावात सेनेचे १५ नगरसेवक तर विधानसभा निवडणुकीतील राष्टÑवादीचे पराभूत उमेदवार अभिषेक पाटील तर धुळ्यात एमआयएमचे आमदार डॉ.फारुक शाह आणि माजी आमदार अनिल गोटे हे पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवून असतील. भाजप ज्या पारदर्शक कारभारासाठी आग्रही असते, तसा कारभार त्यांना महापालिकेत करुन दाखवावा लागेल. अन्यथा आरोप होणारच.भाजपचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून जळगाव आणि धुळ्यात सत्ता आली. शिवसेना आणि राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या महापालिका भाजपने घाऊक पक्षांतराने काबीज केल्या. पण आता हे पक्ष राज्यात सत्ताधारी झाल्याने समीकरण बदलले. अशावेळी सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळी घरवासपीला उत्सुक झाली, तर आश्चर्य वाटायला नको. या चढाओढीत शहरांच्या विकासावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव