धुळे : शिंदखेडा तालुक्यातील 48 गावांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणा:या 2260 कोटी खर्चाच्या सुलवाडे -जामफळ उपसा योजनेला केंद्राने मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर योजना मार्गी लागेल. अतिशय महत्त्वाची ही योजना मंजूर होताच त्याचे श्रेय घेण्यावरून राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. मंजुरीचे श्रेय आपलेच असल्याचा दावा भाजपाचे आमदार गोटे आणि रावल यांनी केला आहे तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी या प्रलंबित योजनेला राज्य शासनाने चालना देण्याची मागणी केली आहे. रोहिदास पाटील यांच्याकडून स्वागत : सुलवाडे-जामफळ-कनोली सिंचन योजनेला महाराष्ट्र शासनाने 1999 साली मंजुरी दिली होती. त्या वेळी योजना 750 कोटी खर्चाची होती. या योजनेसाठी आम्ही सर्वस्तरावर प्रय} केले. मात्र दरम्यानच्या काळात उपसा सिंचन योजनेचे अंदाजपत्रक बदलले 2011-12 मध्ये सुधारित अंदाजपत्रक 2200 कोटींचे तयार केले गेले. आता केंद्र शासनाने 2260 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता दिल्यामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यात शेतक:यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्राने कल्याणकारी निर्णय घेतला. त्यासाठी शासनाचे शेतक:यांच्या वतीने आभार मानत असल्याचे काँग्रेसचे माजी पाटबंधारेमंत्री रोहिदास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.