नशिराबाद - अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला़ अन् यात शेतकरी राजा होरपळला गेला़ शासनाकडून मदत जरी जाहीर करण्यात आली असली तरी खर्चीचा मोह व सत्तेचा ध्यास धरणाºया सर्वच राजकीय पक्षांना सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचा विसर पडलाय दिसतो़राजकारण्यांच्या आडमुठेपणामुळे सरकार स्थापन होत नाही़ त्यामुळे शेतकºयांना शासनाची मदत मिळणार कधी याची प्रतीक्षा आहे़ दरम्यान, शेतकरी बांधवांना जाहीर झालेली मदतही आणखी वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकरी राजाकडून होत आहे़ मात्र, सरकार स्थापनेच्या घोळात जगाचा पोशिंदा मानल्या जोणाºया शेतकºयांला का कोणती सवलत त्वरित दिली जाते नाही, कर्जमाफी पुरेशी दिली जात नाही. कधी सरकार मारते तर कधी निसर्ग शेतकºयाला मारतोय असे स्थिती झाली आहे़यंदा परतीच्या पावसाने हाहाकार उडाला असून नशिराबाद परिसरातील शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे शेतातील सर्व पिके उध्वस्त केली आहेत.पोशिंदा आर्थिक विवंचनेतचांगला पाऊस पडला नाही तरी शेतकºयाला चिंता असते आणि पाऊस जास्त प्रमाणात पडला तरी देखील शेतकºयाचे नुकसान होते़ यंदा अवकाळी पावसाने तर खूपच मोठा फटका दिला आहे. रब्बीची पेरणी कशी करावी याच्या आर्थिक विवंचनेत शेतकरी आहे. आश्वासनांची खैरात करणारे राजकीय पक्ष व नेते सत्तारूढ होण्यासाठी व्यस्त आहे. मात्र शेतकºयांची दखल घेत न्याय द्यावा व अधिक मदत करावी हीच अपेक्षा व्यक्त होत आहे़ संजय काळे शेतकरीराष्टपती राजवट येणे हे दूर्दैव आहे.सरकार स्थापनेचा ठावठिकाणा नाही आणि अवकाळी पावसाचा मारा सुरूच आहे. बळीराजा कडे कोणी लक्ष देईना. खरीपाने कंबरडे मोडले. रब्बीची पेरणी करण्यासाठी पैसा नाही. शासनाची मदत मिळणार कधी याची प्रतीक्षा आहे. शासनाने शेतकºयांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे- डॉ.किरण चौधरी, शेतकरीपरतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले. शासनाने पंचनामे केले मात्र अद्याप मदत मिळाली नाही. गत कालखंडातील कोरड्या दुष्काळाचे अद्याप मदत मिळाली नाही तर आता ओल्या दुष्काळाची मदत मिळेल कधी? की शेतकरीची थट्टाच करताय. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला. सत्ता संघर्ष करणाºया राजकीय पक्षांनी तात्काळ सरकार स्थापन करावे शेतकºयांना न्याय द्यावा हीच अपेक्षा.- सतीश कावळे, शेतकरीअवकाळी पावसामुळे शेतकरी राजा अडचणीत आहे़ मात्र सत्तेच्या संघर्षात जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा राजकीय नेत्यांना विसर पडलेला आहे. भाजप-शिवसेना स्पष्ट बहुमत असतानाही खुर्चीच्या स्वार्थासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सरकार स्थापन झाले तर शेतकºयांच्या डोळ्यातील अश्रू पुसतील व दिलासा देतील अपेक्षा होती मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.-हर्षल वाघुळदे, शेतकरीअवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मदत कधी येणार याची प्रतीक्षा आहे. सर्वच राजकीय पक्षांना मुख्यमंत्री पदाची लालसा असल्याने सरकार स्थापनेत अनेक अडथळे निर्माण झाले आहे. सरकार लवकर स्थापन होऊन शेतकºयांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे.- कल्पेश पाटील, शेतकरी
राजकारण्यांना शेतकऱ्यांचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 9:08 PM