जळगाव- ग्राम विकास मंडळ भोलाणे संचलित माध्यमिक विद्यालयातर्फे मंगळवारी सकाळी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली़ या रॅलीत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, जर करणार नाही मतदान तर होईल खूप नुकसान, आद्यकर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदानाचे अशा विविध घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला होता़नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी जनतेने भरभरून मतदान करून हा लोकशाहीचा उत्सव साजरा करावा यासाठी ही मतदार जनजागृती रॅली शाळेमार्फत काढण्यात आली. याचबरोबर यंदा प्लॅस्टिक मुक्त निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली असल्यामुळे रॅलीतील विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लॅस्टिक कचरा गोळा केला व परिसर स्वच्छ केला़ रॅलीत विद्यार्थ्यांनी विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेतले होते. संस्थेचे अध्यक्ष एकनाथ कोळी तसेच चेअरमन विष्णू कोळी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले़रॅलीच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव सपकाळे, सुनिता सूर्यवंशी, नामदेव सपकाळे, मनोहर पाटील, प्रकाश कोळी, राजश्री सूर्यवंशी, विनोद सावळे, मिलिंद सुरवाडे, रतन खंबायत, समाधान कोळी, प्रकाश सपकाळे, सुनील गोसावी आदींनी परिश्रम घेतले़