भुसावळ, जि.जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भुसावळ येथील जळगाव रोडवरील तहसील कार्यालयातील धान्य गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या व्हीव्हीपॅटच्या १५८ मशीनवर मतदान तपासणी (मॉकपाल) चाचणी करण्यात आली.यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, भुसावळ प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर, फैजपूरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले, भुसावळचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे, यावलचे तहसीलदार कुंदन हिरे तसेच शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मशीनची चाचणी घेण्यात आली. यात १५८ व्हीव्हीपॅट मशीनवर मतदानाची चाचणी करण्यात आली. यात प्रत्यक्ष करून ८८ मशीनवर हजार वेळा, २२ मशीनवर पाचशे वेळा, ४८ मशीनवर १२०० मतदानाची तपासणी करुन खात्री करण्यात आली.दरम्यान, अत्यंत कडेकोट बंदोबस्तात तहसील कार्यालयातील आवारात सीसीटीव्ही कॅमेºयाच्या निगराणीत पोलीस बंदोबस्तात व्हीव्हीपॅटचे ४,३५४ मशीन ठेवण्यात आले असून, याची सुरक्षितता व यंत्रणा कामाचा आढावाही जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी घेतला.
भुसावळ येथे दोन दिवसात १५८ व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 5:10 PM
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भुसावळ येथील जळगाव रोडवरील तहसील कार्यालयातील धान्य गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या व्हीव्हीपॅटच्या १५८ मशीनवर मतदान तपासणी (मॉकपाल) चाचणी करण्यात आली.
ठळक मुद्देप्रात्यक्षिकासाठी जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती८८ मशिनवर हजार वेळा प्रात्यक्षिक