शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

vidhan sabha 2019 : मतदारांसह मतदान केंद्र, सहाय्यकारी मतदान केंद्रात जळगाव शहर मतदार संघाची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:49 PM

सर्वाधिक चार लाख १९६ मतदार : ३६५ मतदान केंद्र तर २९ सहाय्यकारी मतदान केंद्र

जळगाव : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदार, मतदान केंद्र तसेच सहाय्यकारी मतदान केंद्रांची संख्या जळगाव शहर मतदार संघात असून या सर्वांमध्ये या मतदार संघाने आघाडी घेतली आहे. तसेच या सर्वांची सर्वात कमी संख्या एरंडोल मतदार संघात आहे.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विशेष मतदान नोंदणी कार्यक्रम राबविला. त्यात मतदारांची संख्या वाढून जळगाव शहर मतदार संघात ती सर्वाधिक झाली. या आकडेवारीनुसार या मतदार संघात एकूण चार लाख १९६ मतदार आहेत. यामध्ये दोन लाख १० हजार ८६१ पुरुष तर एक लाख ८९ हजार ३०१ महिला मतदार आहेत आणि ३४ इतर मतदार आहेत. इतर मतदारांचीही संख्या याच मतदार सर्वाधिक आहे. जळगाव शहर मतदार संघाखालोखाल चाळीसगाव मतदार संघात एकूण ३ लाख ४१ हजार ४५५ मतदार आहेत. यात १ लाख ८१ हजार ५० पुरुष मतदार, १ लाख ६० हजार ३८६ महिला तर १९ इतर मतदार आहेत. त्यानंतर जळगाव ग्रामीण मतदार संघात एकूण ३ लाख १४ हजार ६०४ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ६३ हजार ७८६ पुरुष, एक लाख ५० हजार ८१७ महिला तर इतर एक मतदार आहे. ११ मतदार संघांमध्ये सर्वात कमी २ लाख ७९ हजार ३३९ मतदार एरंडोल मतदार संघात आहेत. यात एक लाख ४४ हजार ५२७ पुरुष, १ लाख ३४ हजार ८१० महिला व इतर दोन मतदार आहेत.सर्वाधिक ३६५ मतदान केंद्रमतदान केंद्रांची संख्या पाहता तीदेखील जळगाव शहर मतदार संघात सर्वाधिक ३६५ मतदान केंद्र आहेत. याच मतदार संघात सहाय्यकारी मतदान केंद्रांचीही संख्या सर्वाधिक २९ आहे. असे एकूण ३९४ मतदान केंद्र जळगाव शहर मतदार संघात आहेत. ज्या मतदान केंद्रांवर एक हजार ५०० मतदारांपेक्षा जास्त मतदार आहेत, त्या ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव शहरखालोखाल पाचोरा मतदार संघात ६, भुसावळ मतदार संघात ५, जळगाव ग्रामीण व जामनेरमध्ये प्रत्येकी ४, अमळनेर ३, चाळीसगाव २, रावेर मतदार संघात १ सहाय्यकारी मतदान केंद्र आहे. चोपडा, एरंडोल, मुक्ताईनगर या मतदार संघात एकही सहाय्यकारी मतदान केंद्र नाही.मतदारांसह मतदान केंद्र, सहाय्यकारी मतदान केंद्रात ‘जळगाव शहर’ची आघाडी - जोडमतदार संघ निहाय मतदार, मतदान केंद्र व सहाय्यकारी मतदान केंद्रांची संख्यामतदार संघ मतदार मतदान केंद्र सहाय्यकारी मतदान केंद्रचोपडा - ३०७७६० ३१८ ०रावेर - २९२७६३ ३०८ १भुसावळ - ३०७००५ ३०७ ५जळगाव शहर - ४००१९६ ३६५ २९जळगाव ग्रामीण - ३१४६०४ ३२७ ४अमळनेर - २९२९६१ ३१७ ३एरंडोल - २७९३३९ २९० ०चाळीसगाव - ३४१४५५ ३३९ २पाचोरा - ३१२९६२ ३२२ २जामनेर - ३०८४६६ ३२१ ४मुक्ताईनगर - २८९६३७ ३१८ ०एकूण - ३४४७१४८ ३५३२ ५४

टॅग्स :Jalgaonजळगाव