जळगाव : गुन्ह्यांना आळा घालणे व खबरदारीसाठी पोलीस दलाने तयार केलेल्या ‘मीडिया व्हॅन’चा वापर आता मनपा निवडणुकीत होत आहे. या व्हॅनच्या माध्यमातून मतदानाबाबत शहरात जनजागृती केली जात आहे. मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही व्हॅन शहरात फिरणार आहे.जळगाव दौºयावर आलेले राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी या व्हॅनची पाहणी करुन निवडणूक काळात उपयुक्त माहिती मतदारांसमोर पोहचविण्यासाठी या व्हॅनचा चांगला वापर होऊ शकतो असे मत व्यक्त करून त्याचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार ही व्हॅन शहरातील चौकाचौकात जात असून मतदानाचे महत्व पटवून देण्याबाबत जनजागृती करीत आहे. सायबर क्राईम, फसवणूक, मानवी चुकांमुळे होणारे अपघात व त्यात जाणारे जीव, दहशतवाद, जातीयवाद यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या संकल्पनेतून पोलीस दलातर्फे ‘मीडिया व्हॅन’ तयार करण्यात आली आहे.या व्हॅनद्वारे शाळा, महाविद्यालय, बाजार व अन्य गर्दीच्या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.पोलीस दलाच्या वाहनात फेरबदल करुन त्यात मोठा स्क्रीन, चार सीसीटीव्ही कॅमेरे, जनरेटर, स्पीकर आदी सुविधा आहेत. यासाठी सात लाख रुपये खर्च झालेला आहे.गैरप्रकारावरही राहणार लक्षया व्हॅनचे आणखी वैशिष्टे म्हणजे ज्या ठिकाणी ही व्हॅन असेल त्या ठिकाणच्या परिसरातील संपूर्ण व्हीडीओ चित्रण सीसीटीव्ही कॅमेºयात कैद होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.या व्हॅनला अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.
जळगावात पोलीस मीडिया व्हॅनच्या माध्यमातून मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 1:53 PM
गुन्ह्यांना आळा घालणे व खबरदारीसाठी पोलीस दलाने तयार केलेल्या ‘मीडिया व्हॅन’चा वापर आता मनपा निवडणुकीत होत आहे. या व्हॅनच्या माध्यमातून मतदानाबाबत शहरात जनजागृती केली जात आहे.
ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे ठेवली जातेय नजरमतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत व्हॅन फिरणार शहरातमतदानाबाबत केली जाणार जनजागृती