राम जाधवऑनलाईन लोकमत,जळगाव, दि़ 28 - संपूर्ण राज्यातून जुलै महिन्याच्या शेवटी काढता पाय घेतलेल्या पावसाने २० ते २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केल्याने बळीराजाचा हातचा जाणारा खरीप हंगाम वाचला आहे़ मशागतीपासून बी-बियाणे, औषधी, खते आदी खर्च करून या राजाने आपली सर्व गुंतवणूक शेतात केलेली होती़ त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो, की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती़ परंतु निसर्गाच्या कृपेने पुन्हा पाऊस काही ठिकाणी पडत आहे़ मात्र अजूनही या बळीराजाच्या घरात संपूर्ण उत्पन्न येईल की नाही, अशी परिस्थिती आहे़ त्यामुळे शेतकºयांच्या गुणंतवणुकीचा हा सट्टाच लागला आहे़मात्र या पुनरागमनामध्ये पाहिजे तसा दम सर्वत्र नव्हता़ त्यामुळे मोजका काही भाग सोडला तर फारसा पाऊस राज्यात झालेला नाही़ खान्देशातील विचार करता १९ ते २१ आॅगस्ट दरम्यान झालेला पाऊस नंदुरबार जिल्ह्यातील बहुतेक भागात पोहचलाच नाही़ तसेच सोमवारपासून ओसरलेल्या पावसाने मंगळवारीही ओढ कायम ठेवल्याने पुन्हा एकदा शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत़सध्या पावसाचे वातावरण जरी असले, तरी अजूनही खान्देशातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ तर कोरडवाहू शेतकºयांचा अद्यापही जीव टांगणीला लागलेला आहे़ ज्या भागात चांगला पाऊस झालेला आहे़ तेथील पीक परिस्थिती तूर्तास तरी चांगली दिसत आहे़ मात्र गेल्या पंधरा दिवसांच्या खंडामुळे कपाशी, मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात नक्कीच घट येणार आहे़ आता आलेल्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे़खतांची वेळ हुकलीमका हे खादाड पीक असल्याने या पिकाला खतांची मात्रा पुरेशा प्रमाणात असावी, परंतु पाऊस पडत नसल्याने शेतकºयांनी मका पिकासह सर्वच पिकांना खतांचा डोस देण्याचे टाळले़ तर काहींनी पाऊस पडल्यावर गेल्या चार दिवसात कपाशी व मक्याला खते टाकण्याचे काम केले़ परंतु यातील नत्र वगळता स्फुरद व पालाश ही खते २८ दिवसांनंतर पिकांना उपलब्ध होतील़ त्यामुळे खतांचा डोस हुकल्यानेही मका पिकाच्या उत्पादनात साहजिकच घट येईल हे स्पष्ट आहे़कडधान्यांना फटकाचउडीद व मूग या कडधान्यांना मात्र याचा फटका बसला आहे़ गेल्या पंधरवड्यात ऐन शेंगा भरण्याचा काळ असताना व शेवटच्या टप्प्यात पीक असताना पावसाने उघडीप दिली़ यामुळे कडधान्याची पिके कोमेजल्याने उत्पादनात किमान २५ ते ३० टक्के घट तेव्हाच आली़ त्यातही काढणीला आलेल्या उडीद व मुगाच्या शेंगा पावसात भिजल्याने काही प्रमाणात वाया गेल्या़ यामुळे हातचे आलेलेही निसर्गाने हिरावल्याची परिस्थिती बहुतेक शेतकºयांवर ओढवली़मक्याच्या उत्पादनात येणार घटपावसाच्या खंडामुळे धुळे, जामनेर, बोदवड, धरणगाव इत्यादी भागातील मक्याचे पीक मोठ्या प्रमाणावर सुकले होते़ त्यामुळे या पिकाची वाढ अपूर्ण झालेली आहे़ तर इतरही भागातील मका पिकाला पाण्याची ताडम बसल्याने उत्पादनात घट येणारच आहे़ठिबक सिंचनावर लागवड केलेल्या बागायती कपाशीच्या किमान २५-३० पेक्षा जास्त कैºया तयार झाल्या आहेत़ त्यामुळे या पावसाचा या कपाशीला फायदा झालेला आहे़ मात्र कोरडवाहू क्षेत्रातील कपाशी व तूर पिकाला गेल्या आठवड्यात तडाखा बसला होता़ त्यांना आता या पावसाने जरी जीवनदान मिळाले असले, तरी मागील पावसाच्या खंडाचा विपरित परिणाम उत्पादनावर होणार आहे़ अजूनही या पिकाला पाण्याची गरज आहे़जिल्ह्यासह खान्देशात सर्वत्र पिकांची परिस्थिती बिकट झाली होती़ मात्र शेवटी पाऊस आल्याने बळीराजा तारला गेला आहे़ सद्या कपाशी व मकाचे पीक चांगले आहे़ मात्र अजून पावसाची गरज आहे़- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव़
बळीराजाचा खरीप तुर्तास तरी वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:47 PM
उत्पादन मात्र घटणार : पाऊस आल्याने मिळाला थोडासा दिलासा
ठळक मुद्देकोरडवाहू क्षेत्रातील कपाशी व तूर पिकाला फटकाशेतकºयाच्या गुणंतवणुकीचा लागलाय सट्टाअजूनही उत्पादनाची हमी नाही