जळगाव : दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीसह शहरीकरणातही वाढ होत असल्याने शहरी भागात सुविधांवर ताण पडत असल्याचे चित्र रोजगाराच्या शोधामुळे तयार झाले आहे. यास ग्रामीण भागातील दुष्काळी स्थिती कारणीभूत ठरत असल्याने शहरांमध्ये लोकसंख्या अधिक वाढत आहे. २००१ च्या तुलनेत २०११ च्या जनगणनेत जिल्ह्याच्या लोकसंख्येत ५ लाख ४७ हजार २२१ने वाढ झाली आहे. मात्र २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण हे ७८.२ टक्केच आहे. अजूनही हा आकडा ८० टक्क्यांवरही पोहचलेला नाही. लोकसंख्या वाढीचा दर पाहिला तर ०.६२ टक्क्यांनी कमी झाला आहे.शहरी भागात लोकसंख्या अधिकजिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ११.६४ लाख हेक्टर आहे. लागवडी खालील क्षेत्र ८.९३ लाख हेक्टर एवढे आहे. एकूण क्षेत्रफळाच्या ७७ टक्के क्षेत्र हे दरवर्षी लागवडीखाली येत असते. त्यामुळे पूर्वी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त दिसून येत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेतीवर मोठा परिणाम होत आहे. परिणामी रोजगाराच्या शोधात शहराकडे तरुण वर्ग धाव घेत आहे. गेल्या काही वर्षात रोजगाराच्या संधीमुळे जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ यासारख्या शहरांमध्ये झपाट्याने वाढ होत असून लोकांचा ओढा शहराकडे दिसून येत आहे. १९६१ मध्ये शहरी भागात राहणाºया लोकसंख्येची टक्केवारी २७.५३ टक्के होती ती आता ३१.८० टक्क्यांवर पोहोचली आहे. जळगाव शहराची लोकसंख्या ही जिल्ह्याच्या लोकसंख्येपैकी १० टक्क्यांच्यावर अर्थात चार लाख ६० हजार २२८ वर गेली आहे.महिला साक्षरतेवर भर आवश्यकजळगाव शहरात २०११च्या जनगणनेनुसार ४ लाख ६० हजार २२८ एकूण लोकसंख्या असून त्यात स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने कमी म्हणजे ८३.३७ टक्के आहे.त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या साक्षरतेसोबतच महिला साक्षरतेसाठी अधिक भर देण्याची गरज आहे.जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख २९ हजार ९१७२००१ मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ८२ हजार ६९० होती. ही लोकसंख्या २०११ च्या जनगणनेअखेर ४२ लाख २९ हजार ९१७ झाली आहे. लोकसंख्या ५ लाख ४७ हजार २२१ने वाढली आहे. मात्र दशवार्षिक लोकसंख्या वाढ किंवा घटीचे प्रमाण लक्षात घेतले असता लोकसंख्या वाढीत ०.६२ टक्के घट असल्याचे लक्षात येते.घनतेत ४६ ने वाढघनतेचे प्रमाण पाहिले तर ज्या ठिकाणी पूर्वी (२००१) ३१३ व्यक्ती असत तेथे आता ३५४ व्यक्ती रहातात. त्यामुळे घनतेमध्ये ४६ ने वाढ झाल्याचे दिसून येते. हजारी स्त्री-पुरुष प्रमाणातही घट आहे.
लोकसंख्या दिन विशेष : वाढत्या शहरीकरणामुळे सुविधांवर पडतोय ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:53 PM