जळगाव : बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या एका ३६ वर्षीय महिलेला तिच्या घरी असताना अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर अश्लील संदेश, फोटो व व्हिडीओ पाठविल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता जुना खेडी रोड भागात घडली. याप्रकरणी पीडित महिलेने शनी पेठ पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. ज्या क्रमांकावरुन अश्लील फोटो व व्हिडीओ आले तो क्रमांक पोलिसांना देण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहेत.
महिलेच्या मोबाईलवर पाठविले अश्लिल व्हिडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 8:16 PM