जळगाव : चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असतानाही बाधितांचे प्रमाण घटल्याने साेमवारी ११ हजार ९१८ चाचण्यांमध्ये ३१२ बाधित आढळून आले आहेत. हे प्रमाण २.७१ टक्क्यांवर आले असून दुसऱ्या लाटेतील हे एका दिवसातील सर्वाधिक कमी प्रमाण आहे. शहरात १३ नवे बाधित आढळून आले असून एकाही मृत्यूची नोंद नाही, ३५ रुग्ण बरे झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटून ५७२ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण कमी-अधिक झाल्यानंतर रुग्णांचे प्रमाणही कमी-अधिक होत होते. मात्र, सोमवारी वेगळेच चित्र समोर आले. चाचण्यांची संख्या ११ हजारांवर गेल्यानंतरही बाधितांचे प्रमाण हे कमीच असल्याने कोरोलाचा संसर्गच कमी होत असल्याचे एक दिलासादायक चित्र यातून समोर आले आहे. शिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. सद्य:स्थितीत ७२०९ रुग्ण उपचार घेत असून यापैकी ५४१५ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्ये ३६३ रुग्ण दाखल आहेत. उर्वरित रुग्ण कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अनेक रुग्णालयांतील बेड रिक्त आहेत. गंभीर रुग्णांची संख्याही घटली आहे.
चाचण्या अशा
अँटिजन : ९०२३, बाधित २७३, प्रमाण : ३.०२५
आरटीपीसीआरचे आलेले अहवाल : २८९५, बाधित ३९, प्रमाण १.७४ टक्के
शून्य ते दहा रुग्ण
यावल : ००
एरंडोल : ००
पारोळा : ००
जळगाव ग्रामीण : ०३
भडगाव :०६
पाचोरा : ०८
चोपडा :०९
अमळनेर : १०