जळगाव : जळगावात नियोजीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जिल्हा रुग्णालयातून सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू आहे. यासाठी संपूर्ण जिल्हा रुग्णालय वैद्यकीय तंत्रशिक्षण मंडळाच्या (डीएमईआर) ताब्यात द्यावे लागणार असून याबाबत आरोग्यमंत्र्यांकडून अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, या बाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना प्रस्तावाबाबत पत्र दिल्यानंतर त्यांनी आरोग्य संचालकांकडून मार्गदर्शन मागविले आहे. जिल्ह्यात शासनातर्फे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. त्यासाठी प्रस्तावित जागांची पाहणी प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी केली होती.कोठेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे झाल्यास तेथील शासकीय रुग्णालयाचा आधार घेतला जातो. त्यानुसार जळगावातही या हालचाली सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पाच वर्षात पूर्ण करण्यात येऊन तेथे त्याला सुरुवात होईल. तो र्पयत म्हणजे पाच वर्षे जिल्हा रुग्णालयात ते सुरू राहू शकते. या बाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना प्रस्ताव सादर करण्याविषयी पत्र देण्यात आले आहे. या बाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे यांनी आरोग्य उपसंचालकांमार्फत आरोग्य संचालकांकडून मार्गदर्शन मागविले आहे. आरोग्यमंत्रीच घेणार निर्णयजिल्हा रुग्णालय वैद्यकीय तंत्रशिक्षण मंडळाच्या ताब्यात द्यायचे की नाही या बाबत आरोग्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्यात चर्चा होऊन तेच निर्णय घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे. त्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातीलच असल्याने या बाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचेही बोलले जात आहे. कर्मचा:यांचा प्रश्नजिल्हा रुग्णालय वैद्यकीय तंत्रशिक्षण मंडळाकडे गेले तर यामध्ये येथील कर्मचा:यांचाही प्रश्न येतो. ते मंडळाकडे जायचे की नाही या बाबत काय निर्णय घेतात,हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.जिल्हा रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत पत्र देण्यात आले होते. या विषयी आरोग्य उपसंचालकांमार्फत संचालकांकडून मार्गदर्शन मागविले आहे. या बाबत वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय होईल. जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काही कागदपत्रे मागितली तर ती पुरविण्यात येतील. - डॉ. सुनील भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक
वैद्यकीय महाविद्यालयासाठी ‘सिव्हिल’ जाणार ‘डीएमईआर’च्या ताब्यात
By admin | Published: February 22, 2017 12:30 AM