जळगाव - लोकसभा निवडणुकांसाठी ११ मार्च पासून लागू झालेली आचारसंहिता २ मे पासून राज्यभरात शिथील होण्याची शक्यता आहे. गुरुवारी राज्य शासनाच्या होणाऱ्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये आचारसंहिता शिथील होण्याबाबतचा विषय घेण्यात आला असून, आचारसंहिता शिथील झाल्यास दिड महिन्यांपासून शहरातील प्रलंबित कामे सुरू होतील.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मनपाची जवळपास ३०० कोटी अधिक निधीची कामे रखडली आहेत. तर अनेक कामांच्या निविदा काढणे देखील थांबले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता २४ मे रोजी संपणार असून, त्यात महिनाभराचा काळ वाया जाणार आहे.मनपाची प्रलंबित कामेमनपाला शासनाच्या नगरोथ्थान अंतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून होणाºया १६२ कामांना शासनाच्या मंजूरीची प्रतीक्षा असून, आचारसंहिता शिथील झाल्यास मंजूरी मिळू शकते. मलनिस्सारण योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १९६ कोटी तून होणाºया कामासाठी निविदा काढण्यात आली असून, चार निविदाधारकांच्या शासनाकडे पाठविण्यात येणाºया प्रस्तावाला महासभेची मंजूरी आवश्यक असून, आता महासभा घेता येवू शकते. यासह मोकाट कुत्र्यांचा निर्बिजीकरणाबाबत रखडलेली निविदा प्रक्रिया, ५ कोटीच्या विशेष निधीतून होणारी कामे सुरू होतील.राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे आटोपले आहेत. त्याबाबत आता राज्य शासनाने निवडणूक आयोगाकडे विनंती केली तर आचारसंहिता शिथिल होऊ शकते. मात्र सध्यातरी काहीही आदेश नसल्याने आचारसंहिता लागूच आहे.-डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव.
२ मे पासून आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:33 PM