ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 28- पुढे चालत असलेल्या भरधाव वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक महामार्गाखाली उतरुन उलटल्याची घटना बुधवारी सकाळी 5़30 वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपावर घडली़ कानपूर येथून कोंबडी खाद्य घेवून हा ट्रक जळगावातच येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़ दरम्यान सुदैवाने यात मोठी दुर्घटना टळली व चालकही बचावला.चालक ब्रिजकुमार वर्मा रा़ उत्तरप्रदेश हे कानपूर येथून कोंबडी खाद्य भरुन ट्रक (क्र ़एम़पी़ एच़एफ 6744)जळगावाला येत होत़े पहाटे ट्रक जळगावात पोहचला़ यादरम्यान शहरात प्रवेश करत असताना गुजराल पेट्रोल पंपाजवळ सकाळी 5़30 वाजेच्या सुमारास ट्रकच्या समोर चालत असलेल्या चारचाकीने अचानक ब्रेक दाबले. ट्रकचालकाला अंदाज न आल्याने भरधाव ट्रक अचानक थांबविता येत नव्हता, तसेच समोरुन येत असलेल्या वाहनांमुळे ओव्हरटेकही करता येत नव्हत़े यात चालक वर्मा यांनी प्रसंगावधान राखत ट्रक महामार्गाखाली उतरविला़ या प्रयत्नात ट्रकने चालकाच्या बाजूने उलटला. दैव बलवत्तर म्हणून चालक बचावला़ कोंबडी खाद्याचे नुकसानट्रक उलटल्यावर दुस:या बाजूने ट्रक चालक बाहेर निघाला़ त्याला किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. ट्रकसह ट्रकमधील अध्र्यावर कोंबडी खाद्याचे नुकसान झाले आह़े वर्मा यांनी दुसरा ट्रक बोलावून त्यातील शिल्लक कोंबडी खाद्य रवाना केल़ेक्रेनची मदत उशीरार्पयत खाजगी क्रेनच्या सहाय्याने ट्रक उभा करण्याचे काम सुरु होते. अपघातानंतर ट्रकला पाहण्यासाठी पहाटे मॉर्किगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती़ अपघातांचे सत्र सुरूचमहामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. यात प्रामुख्याने महामार्गालगत साईडपट्टय़ांमुळे अधिक अपघात होत असल्याचे लक्षात येते. साईड पट्टय़ांजवळस उतार असल्यानेच हे अपघात होत असतात. त्यातच वाहनांच्या गतीवरही नियंत्रण नसल्याने भरधाव वाहने कुणाचीही परवा न करता या मार्गावरून जा- ये करत असल्याचे लक्षात येते.