आॅनलाईन लोकमतचाळीसगाव दि : ९ : स्पर्धा परीक्षेत खान्देशाचा टक्का अलिकडे चांगलाच वाढला आहे. थेट वाडी-वस्तीतील मुलेही परीक्षेत यश संपादन करीत आहेत. फीनिक्स भरारी घेणा-या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करुन देऊन जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी त्यांच्या पंखांमध्ये नवे बळ पेरले आहे. त्यांनी २५ हजाराची स्पर्धा परीक्षेची पुस्तके दान केली आहेत.प्राथमिक शिक्षक वामन पाटील व त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील हे गेल्या काही वषार्पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. आजवर १३०० मुलांनी अधिकारी होण्याच्या स्वप्नांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली गवसणी घातलीयं. प्रमोद पाटील यांनी पाटील दाम्पत्याच्या या शैक्षणिक उपक्रमाला पुस्तक दानाची उर्जा दिली आहे. हा सोहळा मंगळवारी दृष्टी फाऊंडेशन येथे स्व.लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पार पडला.यावेळी माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांच्यासह चाळीसगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व निवृत्त प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, शिवाजी आमले, कर्तारसिंह परदेशी, प्रदीप देशमुख, वामन पाटील, मंगेश पाटील, दिनेश पाटील, जालम पाटील, अभय सोनवणे, संजय चव्हाण, नगरसेवक श्याम देशमुख, भगवान राजपूत, रामचंद्र जाधव, जगदीश चौधरी, भुषण ब्राम्हणकार, फकिरा बेग मिर्झा, अजय पाटील, बाजीराव दौंड, शिवाजी सोनवणे, तसेच जयाजी भोसले, छोटू पाटील, प्रदीप अहिरराव, आर.के.माळी, मिलिंद शेलार, भैयासाहेब पाटील, राजेंद्र मोरे, देवा राजपूत, शुभम पवार, आकाश पोळ, यज्ञेश बाविस्कर उपस्थित होते.
चाळीसगावात स्पर्धा परीक्षेच्या लक्ष्यभेदासाठी दातृत्वाची उर्जा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 6:05 PM
चाळीसगाव येथील प्रमोद पाटील यांनी दिली २५ हजाराची पुस्तके केली दान
ठळक मुद्दे२५ हजारांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके केली दानजिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांचे दातृत्त्वस्व.लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पार पडला कार्यक्रम