जळगाव : शहरातील बहुतांश भागात बुधवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. वीजपुरवठा अचानक खंडित होण्याच्या प्रकारांमुळे पंखे व कूलर बंद पडल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते.
उन्हाळा सुरू असून तापमानात सुध्दा कमालीची वाढ झाली आहे. दुसरीकडे उकाडाही प्रचंड वाढला आहे. त्यात वारंवार अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. पिंप्राळा भागात दिवसभरातून अनेकदा वीजपुरवठा खंडित झाला होता.
-----
गणेश कॉलनी रस्त्यावर तोबा गर्दी
जळगाव : शहरातील गणेश कॉलनी रस्त्यावर बुधवारी सायंकाळी भाजी आणि इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बुधवारी रात्री आठपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. अनेकजण मास्क न लावता देखील फिरत होते.