शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कासोद्यासह पाच गावांच्या पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 1:52 AM

प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बिल न भरल्याने १६ नोव्हेंबर पासून खंडीत करण्यात आला आहे. नदीला भरपूर पाणी असून देखील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ प्रशासनामुळे आली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली ?स्थानिक शिखर समिती व सरपंचाचे प्रयत्नही निष्फळ

कासोदा, ता. एरंडोल : येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बिल न भरल्याने १६ नोव्हेंबर पासून खंडीत करण्यात आला आहे.नदीला भरपूर पाणी असून देखील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ प्रशासनामुळे आली आहे. विशेष हे की, याच महिन्यांत पालकमंत्र्यांनी कोणत्याच सार्वजनिक पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार नसल्याची माहिती जळगावच्याच बैठकीत दिली होती. पण खुद्द पालकमंत्र्यांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराच्या टोपलीत फेकून दिले का ? अशा संतप्त प्रतिक्रिया येथे व्यक्त होत आहेत.कासोदा, आडगांव, तळई, वनकोठा, बांभोरीसह सुमारे एक लाखाच्यावर लोकसंख्या या पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहे. कासोद्यापासून १४ कि.मी.अंतराहून गिरणा नदीवरील दहिगांव बंधाºयातून येथे पाणी पुरवठा होतो. नेहमी प्रमाणे वीज बिल थकल्यामुळे (चालू महिन्याचे चार लाख) वीज वितरण कंपनीकडून हा पुरवठा तोडण्यात आला आहे. स्थानिक शिखर समिती व सरपंचांनी कर वसूली होत नाही, दुष्काळी परिस्थिती आहे, वीज पुरवठा सुरू न झाल्यास रास्ता रोको करू अशा नेहमीच्या पध्दतीने वीज अधिकाºयांकडे शनिवारी प्रयत्न करून पाहिला, पण वीज अधिकारी यांनी त्यांना जुमानले नाही. त्यांनी वरीष्ठांचे आदेश आहेत, त्यामुळेच वीज पुरवठा कापला, या भूमिकेवर ठाम राहून संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा सुरू केला नाही.दरम्यान, शिखर समिती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार यांनी आपआपल्या पध्दतीने प्रयत्न केलेत, पण सगळे व्यर्थ ठरले. आता जनता मिळेल तेथून पाणी मिळवण्यासाठी भटकत आहे. १८ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने सरकारी कार्यालयास सुटी राहिल, सोमवारी काय निर्णय होतो, याकडे आता जनतेचे लक्ष आहे.दरम्यान, शनिवारी रात्री उशीरापर्यंत वीज मंडळाच्या अधिकाºयांना कोणतेही आदेश नसल्याने वीज जोडणी बाबत हालचाली झालेल्या नव्हत्या. असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Power Shutdownभारनियमन