ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.23- जिल्ह्यातील जळगांव, भुसावळ व पाचोरा या विभागातील वीज पुरवठा तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरीता शनिवार 24 जून रोजी दोन ते चार तास बंद राहणार असल्याचे महावितरण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
भुसावळ विभागातील 132 केव्ही पहूर उपकेंद्रातून निघणा:या 33/11 केव्ही तळेगाव, फत्तेपुर,शेंदुर्णी,नेरी,तोंडापुर व पिंपळगाव या सहा उपकेंद्रावरील वीजपुरवठा सकाळी 10 ते दुपारी 12 या दोन तासाकरीता बंद राहणार आहे. त्यात तळेगांव,आमखेडा, शहापुर, भाटी, सामरोड, फत्तेपुर शेती, वाकडी शेती, तोंडापुर शेती, गोद्री शेती तोंडापुर गावठाण, फत्तेपुर गावठाण, गोद्री गावठाण,देउळगाव, मेंगाव, शेंदुर्णी, बिलवाडी, मेंगाव गावठाण, नेरी, मोहाडी शेती, नेरी गावठाण, मोहाडी गावठाण, गाडेगांव शेती, चिंचखेडा, भारूडखेडा, भगदरा, सोनाला, टाकली या 11 केव्ही वाहिन्यांवरील वीजपुरवठा बंद राहील.
जळगांव विभागातील 220 केव्ही बांभोरी उपकेंद्रातून निघणा-या 33/11 केव्ही किनोद या उपकेंद्रावरील किनोद, फुपनगरी, देवगाव, अमोदे, जामोद, पळसोद, भोकर, भादली खुर्द, गाढोदे या भागातील वीजपुरवठा दुपारी 1.30 ते 4 या वेळेत बंद राहील. 33/11 केव्ही कानळदा या उपकेंद्रावरील कानळदा, आव्हाणे , खेडी, वडनगरी,नंदगाव,पिलखेडा, कुंवरखेडा, फुपनगरी, नांद्रा ,फेसर्डी या भागातील वीजपुरवठा दुपारी 4.00 ते 6.30 या वेळेत बंद राहील. 33 केव्ही शिवाजीनगर उपकेंद्रावरील शिवाजीनगर, प्रजापतनगर, इंद्रप्रस्थनगर, गेंदालाल मिल, राजमालतीनगर, मिल्क फेडरेशन परिसर, महावीरनगर, दत्त कॉलनी, उस्मानिया पार्क, सत्यम पार्क, कानळदा रोड परिसर, रेल्वे कॉलनी, केसी पार्क, काळे नगर, भुरेमामलेदार परिसर, केजीएन पार्क, महम्मदीया नगर, लाकुडपेठ परिसर, उमर कॉलनी, त्रिभुवन कॉलनी, हरिओमनगर,आरवाय पार्क, फुपनगरी, घरकुल परिसर या भागातील वीजपुरवठा सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत बंद राहील.
पाचोरा विभागातील 132 केव्ही पारोळा या उपकेंद्रातून निघालेल्या 132 केव्ही अंमळनेर पारोळा बे-लाईनवरील 33 केव्ही पारोळा, तामसवाडी, सावखेडा, बद्रापूर, मंगरूळ व र}पिंप्री या सहा उपकेंद्रावरील वीजपुरवठा सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत बंद राहणार आहे.