ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 06- संगीत शिकण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, तर हे शिक्षण आपल्या सरावावर अवलंबून असत़े सुरुवातीला प्रत्येक गोष्ट अवघड असते मात्र, त्यात आवड असेल तर लवकरच आपण त्यात यशस्वी होतो. अशाच प्रकारे सरावातूनत संगीताचे उत्तम धडे मिळू शकतात, असे मत इसराज वादक उस्ताद अर्शद खान व सुफी, गझल गायिका पूजा गायतोंडे यांनी व्यक्त केल़ेचांदोरकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित संगीत महोत्सवानिमित्त ते जळगावात आले असून शुक्रवारी दुपारी कांताई सभागृहात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होत़े सुफी, गझल व इसराद वाद्याचा प्रथमच बालगंधर्व सगीत महोत्सवात सामावेश करण्यात आला आह़े तसेच गायन व वादन प्रकारात शास्त्रीय संगीताला अधिक महत्व असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितल़े
सुफी, गझल गायनासाठी शास्त्रीय संगीत महत्त्वाचेयावेळी पूजा गायतोंडे म्हणाल्या की, गझल आणि सुफी हे एकच आहे फक्त नाव वेगवेगळे आह़े देवाला किंवा मौलांना उपदेशून जे गायिले जाते त्याला गझल किंवा सुफी म्हटले जात़े यास मराठीत भजन असेही संबोधिले जात़े सुफी, गझल गायन हे हिंदी किंवा उर्दू भाषेत अधिक चांगले वाटत़े त्यासाठी शास्त्रीय संगीत हे खूप महत्त्वाचे असते, असेही त्या म्हणाल्या़
इसराज वाद्यास वाढती पसंतीउस्ताद अर्शद खान यांनी सांगितले की, इसराज हे वाद्य सितार वाद्यासारखे असून पंजाबमध्ये दिलरुबा या नावाने ते ओळखले जाते. या इसराज वाद्याचा बॉलिवूडमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर वापर होत असून त्यास लोकप्रियताही तेवढीच मिळत आहे, असे खान यांनी सांगितल़े इसराज वाद्यास 300 वर्षाची परंपराउस्ताद अर्शद खान पुढे म्हणाले की, इसराज हे वाद्य 300 वर्षापूर्वीचे असून कोलकता येथून हे वाद्य प्रसिध्दीस आले आह़े त्या नंतर हे वाद्य पंजाबमध्ये दिलरुबा या वेगळ्या नावाने प्रसिध्दीस आल़े मी सात-आठ वर्षाचा असताना माङया आजोबांपासून मला प्रेरणा मिळाली व माङो वडील आणि अहेमद नंदन खान साहेबांकडून मी ही कला अवगत केली. बॉलिवूडमध्ये सलमान खान, शाहरुख खान व आमिर खान यांच्या चित्रपटांसह अनेक चित्रपटांमध्ये संगीत दिले असल्याचेही ते म्हणाले.
गुरुंच्या सल्ल्याने वळले गझल गायनाकडे
पूजा गायतोंडे यांनी सांगितले की, लहान असताना त्यांच्या आईने त्यांना शास्त्रीय गायनासाठी क्लास लावला. त्यावेळी त्यांचे गुरु विकास भाटोळेकर यांनी त्यांचा आवाज ऐकून तू गझलकडे वळावे असा सल्ला दिला़ त्यानंतर मी गझलकडे वळली, असे गायतोंडे यांनी सांगितल़े मी सुफी, गझलकडे वळल्यानंतर गझल चांगल्या प्रकारे सादर करण्यासाठी मला उर्दू भाषेची अडचण येऊ लागली. मला त्यासाठी उर्दू भाषा अवगत नसल्याने या अडचणी स्वाभाविक होत्या़ लोकांसमोर आपण काय सादर करतो त्यापेक्षा कसे सादर करतो हे जास्त महत्त्वाचे असल्याने मी उर्दू भाषाही शिकले, असेही गायतोंडे यांनी सांगितले.