विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : वाढदिवस म्हटला म्हणजे घरात आनंदाची पर्वणी असते. प्रत्येक जण आपल्या प्रियजनाचा वाढदिवस अतिशय उत्साहात आनंदात व विविध अशा मेजवानीने साजरा करत असतात. मात्र मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात पानटपरी चालवणाऱ्या व्यावसायिकाने मात्र एक आगळा वेगळा उपक्रम आखत अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीचा वाढदिवस मात्र गरीब व गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करून आणि जळगावच्या मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन अन्नदान करून साजरा केला.मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात विशाल पान सेंटर आहे. धनंजय रामदास सापधरे हे अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतात. विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असलेले धनंजय सापधरे हे सामाजिक सेवेतदेखील आपले योगदान गेल्या अनेक वर्षांपासून देत आहेत.त्यांच्या पत्नी सपना सापधरे यांचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त साधत सापधरे यांनी तो घरगुती वातावरणात अथवा मेजवानी साजरा न करता, मुक्ताईनगर येथील एकलव्यनगरात गरीब व गरजू महिलांना ब्लँकेट वाटप करून साजरा केला. एवढेच नव्हे तर जळगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन तेथेदेखील त्यांनी ब्लँकेट वाटप केले आणि अन्नदानदेखील केले.याप्रसंगी मुक्ताईनगर येथील कार्यक्रमप्रसंगी डीवाय.एस.पी. सुभाष नेवे, नगराध्यक्षा नजमा तडवी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, अॅड.राहुल पाटील, सावकारे, मोहन मेढे आदी उपस्थित होते.
मुक्ताईनगर येथील पानटपरीचालकाचा स्तुत्य उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 3:15 PM
वाढदिवस म्हटला म्हणजे घरात आनंदाची पर्वणी असते. प्रत्येक जण आपल्या प्रियजनाचा वाढदिवस अतिशय उत्साहात आनंदात व विविध अशा मेजवानीने साजरा करत असतात. मात्र मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात पानटपरी चालवणाऱ्या व्यावसायिकाने मात्र एक आगळा वेगळा उपक्रम आखत अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीचा वाढदिवस मात्र गरीब व गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करून आणि जळगावच्या मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन अन्नदान करून साजरा केला.
ठळक मुद्देअंगणवाडी सेविका पत्नीचा वाढदिवस साजरा केला गरजूंना ब्लँकेट वाटपजळगाव येथे मातोश्री वृद्धाश्रमातही अन्नदान करूनपानटपरीचालकाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक