भुसावळ : येथील डॉ.मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे यंदाही उल्लेखनीय कार्य करणाºया शिक्षकांचा प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२० ने गौरव करण्यात आला. तसेच जे. टी अग्रवाल यांचा शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक शिक्षकदिनी पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.नि:स्वार्थ भावनेने ज्ञानदान आणि विद्यार्थी घडवण्याचे कार्य अविरत करणाºया भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद, पालिका, खाजगी व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, तंत्र शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात अध्यापनाचे उल्लेखनीय कार्य करणाºया शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. आदर्श संस्कारक्षम पिढी घडविण्यात मोलाचा वाटा असणाºया हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल यांना प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.व्यासपीठावर अध्यक्षस्थानी चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अरूणा शिरीष चौधरी होत्या. विशेष अतिथी व वक्ते म्हणून बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील, सेंट्रल रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी, डॉ.मानवतकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ.मधू राजेश मानवतकर, उपाध्यक्ष डॉ.राजेश मानवतकर उपस्थित होते.मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी आॅनलाईन आॅडिओ पद्धतीने शिक्षकांशी संवाद साधला.पुरस्कारार्थी प्रतिनिधी म्हणून मनोज भोसले, संध्या भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.मधू मानवतकर यांनी, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिशीर जावळे यांनी केले. यशस्वीतेसाठी कृपा महाजन, दामिनी पाटील, सतीश महाजन, देवेंद्र राजपूत, आर.के. कोळी, मनोज यादव, संतोष मौर्य, बाळू पाटील यांनी परिश्रम घेतले.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 6:54 PM
डॉ.मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
ठळक मुद्देडॉ.मानवतकर बहुद्देशीय संस्थेचा उपक्रमजे. टी अग्रवाल यांचा शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मान