सवरेत्कृष्ट लेखिकेचा मान कल्पना दुधाळ यांना यंदाचा सवरेत्कृष्ट लेखिका ‘कवयित्री बहिणाई पुरस्कार’ जाहीर झालेल्या कल्पना दुधाळ ह्या शेतकरी गृहिणी आहेत. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कला शाखेच्या पदवीधर असलेल्या या लेखिकेचा ‘सिझर कर म्हणतेय माती’ हा पहिला कवितासंग्रह 2010 मध्ये प्रकाशित झालेला आहे. याला वेगवेगळे 18 पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्य पुरस्कार, यासोबतच शेतकरी पुरस्कार, मसाप पुणेचा कुसुमाग्रज काव्य पुरस्कारासह इतर पुरस्कार मिळाले आहेत. तसेच सोलापूर, मुंबई विद्यापीठात एसवायबीएला आणि आता उमविमध्ये हा काव्यसंग्रह अभ्यासाला आहे. यासोबतच साहित्य अकादमीच्या जोधपूर, भोपाळ, दिल्ली येथील लेखिका संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभागी झाल्या आहेत. यानंतर एप्रिल 2016 मध्ये ‘धग असतेच आसपास’ हा दुसरा कवितासंग्रह त्यांचा प्रकाशित झाला. यालाही लोककवी विठ्ठल वाघ, यशवंतराव दाते पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्र वनवाहिनीचा सावित्री सन्मान मुख्यंमत्र्यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेला आहे. सवरेत्कृष्ट कवीचा मान वाहरू सोनवणे यांना यंदाचा सवरेत्कृष्ट कवी ‘बालकवी ठोंबरे पुरस्कार’ जाहीर झालेल्या वाहरू सोनवणे यांचा आदिवासी समाजात प्रचंड जनसंपर्क. यातूनच महाराष्ट्र शासनाने 2001-02 मध्ये आदिवासी सेवक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. महत्त्वाचे म्हणजे ‘गोधड’ हा त्यांचा काव्यसंग्रह. याला मसाप पुणेचा कुसुमाग्रज पुरस्कार 1988 मध्ये मिळाला. याशिवाय कोल्हापुरात 2001 मध्ये आबाजी गवळी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, 2006 मध्ये समाजकार्य पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे. त्यांचा ‘निवडक कविता’ हा कविता संग्रह 2000 मध्ये प्रकाशित झाला. 2007 मध्ये दहावीच्या कुमारभारती पुस्तकात ’गोधड’मधील कविता, ‘आई पहिली लढाई आपलीच’ या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याने त्यांच्या साहित्याचा हा सन्मानच म्हणावा लागणार आहे. ‘गोधड’ काव्यसंग्रहाचा हिंदी भाषेत ‘पहाड हिलने लगा’ अनुवाद झालेला आहे. गोधड कवितासंग्रह उमवित एमएच्या द्वितीय वर्षाला तसेच अमरावती विद्यापीठात एम. ए. प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमाला आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, नांदेड विद्यापीठ, मुंबई विद्यापीठातही प्रथम वर्ष बी.ए.साठी ‘गोधड’ची निवड झाली आहे. यासोबतच पालघर, जि. ठाणे येथे पाचव्या आदिवासी साहित्य संमेलनो अध्यक्ष, परिवर्तनवादी साहित्य संमेलन साकोली, दुसरे विद्रोही साहित्य संमेलन कोल्हापूर, नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन यातही अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला आहे. सवरेत्कृष्ट गद्य लेखनाचा मान किरण गुरव यांना यंदाचा सवरेत्कृष्ट गद्य लेखन ‘ना. धों. महानोर पुरस्कार’ जाहीर झालेल्या किरण अनंत गुरव यांचा ‘राखीव सावल्यांचा खेळ’ व ‘श्रीलिपी’ ह कथासंग्रह 2012 मध्ये प्रकाशित झाले आहेत. यानंतर राखीव सावल्यांचा खेळ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा ग. ल. ठोकळ उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कारासह कथाकार शांताराम पुरस्कार, सुभाष भेंडे नवोदित लेखक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच या कथासंग्रहांना इतरही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. श्रीलिपी कथासंग्रहातील वडाप या कथेचा शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. भाग 1 साठी मराठी विषयाच्या पाठय़पुस्तकात 2012-15 या काळात समावेश होता. कोल्हापूर विद्यापीठातून एम. ए. मराठी, नेट, एम.फिल, पीएच.डी. झालेल्या किरण गुरव यांचे साहित्य ठिकठिकाणच्यानियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
सारस्वतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 7:04 PM