भुसावळ : नगराध्यक्ष रमण भोळे हे खासगी कामानिमित्त रजेवर गेल्यामुळे उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांची प्रभारी नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. ‘लोकमत’ने या विषयी ६ जुलै रोजी ‘प्रभारी नगराध्यक्षपदी लागणार नेमाडे यांची वर्णी’ असे भाकीत केले होते. ते अखेर खरे ठरले.
ही दोस्ती तुटायची नाय..
लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे व उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांची दोस्ती अनेक वर्षांपासूनची असून आपल्या मित्राला नगराध्यक्षपदाची संधी मिळावी या भावनेतूनन भोळे यांनी नेमाडे यांना प्रभारी नगराध्यक्षपदाची संधी दिली. ही दोस्ती तुटायची नाही अशी चर्चा यानिमित्त राजकीय वर्तुळात होताना दिसून आली. यापूर्वी याच टर्ममध्ये सुरुवातीच्या वर्षात युवराज लोणारी यांना काही दिवसासाठी नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती.
नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार रोजी सभा
कोरोना काळामध्ये २७ नोव्हेंबर २०२० नंतर सर्वसाधारण सभा झालेली नाही. आता प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली ३१७ विषय अजेंड्यावर असलेली पालिकेची सर्वसाधारण सभा १६ रोजी होणार आहे.
प्रभारी नगराध्यक्ष नेमाडे यांच्या निवडीबद्दल वसंत पाटील ,किरण कोलते, पुरुषोत्तम नारखेडे, महेंद्रसिंग ठाकूर, मुकेश पाटील, गिरीश महाजन, राजेंद्र नाटकर, दिनेश नेमाडे, किशोर पाटील, सतीश सपकाळे, निकी बतरा, प्रा. दिनेश राठी, देवा वाणी मुकेश गुंजाळ आदींनी शुभेच्छा देऊन स्वागत केले. दरम्यान किती कालावधी नेमाडे यांना मिळणार आहे, हे मात्र अद्याप निश्चित नाही.
प्रभारी नगराध्यक्ष नेमाडे यांचे स्वागत करताना पदाधिकारी व नगरसेवक आदी. (छाया : वासेफ पटेल)