शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

मुक्ताईनगर येथील वृद्ध महिलेचे खामखेडा पुलावरून उडी घेत आत्महत्या करताना वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 4:27 PM

मुक्ताईनगर-बºहाणपूर रस्त्यावरील खामखेडा पुलावरून आजदेखील मुक्ताईनगर शहरातील एका वृद्ध महिलेने उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी नदीत माशांचे जाळे जमा करत असलेले भारत भोई यांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्काळ पाण्यात उडी मारून या वृद्धेचे प्राण वाचवले.

ठळक मुद्देभारत भोई खऱ्या अर्थाने ठरले जीवरक्षकभारत भोई यांनी आतापर्यंत वाचविले आठ जणांचे प्राणखामखेडा पूल ठरतोय आत्महत्येचे केंद्र

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर-बºहाणपूर रस्त्यावरील खामखेडा पुलावरून आजदेखील मुक्ताईनगर शहरातील एका वृद्ध महिलेने उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी नदीत माशांचे जाळे जमा करत असलेले भारत भोई यांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्काळ पाण्यात उडी मारून या वृद्धेचे प्राण वाचवले. आतापर्र्यंत आठ जणांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेले भारत भोई हे खऱ्या अर्थाने खामखेडा पुलावरील जीवरक्षक ठरले आहे.मुक्ताईनगर येथील बेबाबाई एकनाथ गोसावी (वय ६०) या रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास पायी मुक्ताईनगर शहरातून पूर्णा नदीकडे आल्या. खामखेडा पुलावर मध्यभागी गेल्यानंतर बेबाबार्इंनी काहीही विचार न करता कठडा चढून उंचावरून खोल पाण्यात उडी मारली. त्याच वेळी भारत चुनीलाल भोई व त्यांची दोन्ही मुले संजय भारत भोई व संतोष भारत होईल हे मासेमारी करत होते. नदीमध्ये महिला उडी मारत आहे हे लांबूनच भारत भोई यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता जाळे फेकून देत तत्काळ नदीत उडी घेतली व अतिशय वेगाने पोहत जाऊन पुलाखाली बुडत असलेल्या बेबाबाई गोसावी यांना त्यांनी पकडले. भारत भोई बेबाबार्इंपर्र्यंत पोहोचेपर्र्यंत त्यांनी तीनदा पाण्यात डुबकी घेतलेली होती. त्यामुळे त्यांच्यापर्र्यंत भोई हे तत्काळ पोहोचले नसते तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले नसते. आपल्या दोन्ही मुलांच्या साह्याने भारत भोई यांनी बेबाबाई यांना होडीपर्यंत पोहत पोहत आणत सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर तत्काळ मुक्ताईनगर येथील विशाल पान सेंटरचे संचालक धनंजय सापधरे, अतिक खान, दीपक तळेले व अनेक पुरुष मंडळी यांनी मदत केली, तर धनंजय सापधरे यांनी बेबाबाई यांना आपल्या मोटारसायकलवर बसवून घरी नेऊन सोडले.भारत भोई खºया अर्थाने जीवरक्षकखामखेडा पूल म्हणजे सामुदायिक आत्महत्या केंद्र बनल्याचे एक प्रकारचे ठिकाण आहे. पूल बनल्यापासून आतापर्यंत शेकडो जणांनी त्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व त्यातील अनेकांचे प्राणही गेले. मात्र या ठिकाणी गेल्या १० वर्षांपासून भारत भोई यांनी स्वत:चे दुकान थाटल्यापासून याही वेळेस आत्महत्या किंवा अपघात होऊन पाण्यात कोणी बुडत असेल तर ते स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात.आतापर्यंत भारत भोई यांनी मुक्ताईनगर येथील तीन जणांचे प्राण वाचवले आहेत तर उचंदा, मनुर बुद्रूक, सुकळी, मेळसांगवे, धाबे पिंपरीत या गावातील प्रत्येकी एक महिला व पुरुषांचे प्राणदेखील त्यांनी आतापर्यंत वाचलेले आहे. यासोबतच मयत झालेले किंवा प्रेत वाहून आल्यास त्यांना काढून पोलिसांना व प्रशासनाला मदत करण्याचे कार्यदेखील भारत भोई हे निरंतर करत आहे.यापूर्वी पोलीस यंत्रणेद्वारा त्यांना प्रमाणपत्र त्यांच्या या जीव वाचवण्याच्या उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात आले आहे. मात्र खºया अर्थाने जीवरक्षक असलेले भारत भोई यांना राज्याचा अथवा केंद्र शासनाचा पुरस्कार मिळणेदेखील त्यांच्या कार्याचा गौरव ठरेल, असे येथे म्हटले जात आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याMuktainagarमुक्ताईनगर