लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगावचे प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार नामदेव पाटील यांनी शुक्रवारी शहरातील तीन ते चार प्रमुख रेमडेसिवीर विक्रेत्यांची तपासणी केली. रेमडेसिवीरचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी ही तपासणी केली.
या तपासणी पथकात मनपा उपायुक्त संतोष वाहुळे, नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर, अन्न आणि औषध विभागाचे आबासाहेब रासकर यांचा समावेश होता. त्यासोबतच प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी २२ महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक तयार केले आहे. त्यांना दिलेल्या तक्त्याप्रमाणे किती इंजेक्शन वायल्स आहेत. रुग्णांना विक्री होत आहे की नाही, त्यांचा आरटीपीसीआर अहवाल, त्यासोबतच शासनाचे इतर नियम पाळले जात आहेत की नाही. दर तपासणी करण्याचे आणि माहिती योग्य भरली जात आहे की नाही, याची निरीक्षकांनी खात्री करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
तपासणी करताना तहसीलदार नामदेव पाटील.