आॅनलाईन लोकमत,
जळगाव, दि.१८-पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे प्र्रथम पारितोषिक अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या ‘रावीपार’ या एकांकिकेने पटकाविले. व्दितीय पारितोषिक औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘नाटक’ या एकांकिकेने तर तृतीय पारितोषिक जळगावातील डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या ‘च्या बही’ एकांकिकेने पटकाविले. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते अरु ण नलावडे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
महाराष्टÑ कलोपासक पुणे व मू.जे.महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाकडून शहरातील भय्यासाहेब गंधे सभागृहात १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत एकूण १४ एकांकिका सादर करण्यात आल्या. या स्पर्धेचा निकाल रविवारी रात्री ९ वाजता जाहीर करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते अरु ण नलावडे हे होते. तर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, केसीई संस्थेचे सदस्य हरिश मिलवाणी, मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, कलोपासक पुणेचे राजेंद्र नागरे, परीक्षक श्रीपाद देशपांडे, अजय धवने, गिरीष केमकर, संस्थेचे सभासद शशिकांत वडोदकर, प्रा.चारुदत्त गोखले आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रकार - एकांकिका - महाविद्यालय सांघिक प्रथम - रावीपार - प्रताप महाविद्यालय, अमळनेरसांघिक व्दितीय - नाटक - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबादसांघिक तृतीय - च्या बही - डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगावसर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका - एक्स - पु.ओ.नाहाटा महाविद्यालय,भुसावळ
इन्फोअभिनय नैैपुण्य पुरुष - नाटक - अभय पिंगळे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबादअभिनय नैपुण्य स्त्री -च्या बही - सपना बाविस्कर, डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालय, जळगावसर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैैपुण्य - पुरुष - भाग्यश्री भंगाळे, कोटेचा महाविद्यालय, भुसावळसर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य - एक्स - स्वरदा गाडगीळ, पु.ओ.नहाटा महाविद्यालय, भुसावळसर्वोत्कृष्ट लेखिका -एक्स - स्वरदा गाडगीळ, पु.ओ.नहाटा महाविद्यालय, भुसावळसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - रावीपार - भूमिका पाटील, प्रताप महाविद्यालय, अमळनेर