आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये यंदा प्रथमच जिल्ह्यात मान्सूनपूर्व कापसाची लागवड वेळेत होऊ शकली नाही. अनधिकृत बियाणे विक्री आणि लागवड हा गुन्हा असताना चोपडा तालुक्यात काही ठिकाणी मध्य प्रदेशातील बियाणे आणून लागवड करण्यात आली आहे. दरम्यान यापैकी काही बियाणे बोगस असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.गेल्या वेळी कापसावर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या रोगामुळे शासनाने बोगस बियाण्यांना पायबंद बसविण्यासाठी कडक कायदा केला आहे. तसेच मान्सूनपूर्व कापूस लागवडीत उन्हामुळे कापूस लाल पडून रोग पडण्याची शक्यता अधिक असते. यामुळे यंदा राज्य सरकारतर्फे कापूस बियाणे बाजारात उशिरा आणले जात असल्याने मान्सूनपूर्व लागवड आता तब्बल १५ दिवस उशिराने होणार आहे.शेतकऱ्यांची घाई अडचणीची ठरू ठकतेचोपडा तालुक्यात गेल्या सप्ताहातच काही शेतकºयांनी कापूस लागवड केली आहे. मध्य प्रदेशातून बियाणे येथे आणले जात आहे. यासोबत काही बोगस बियाणे येत असल्याचीही भीती आहे. असे आढळल्यास बोगस बियाणे लागवड करणाºया शेतकºयासही शिक्षेचा दणका बसू शकतो.बोगस बियाणे नसले तरी उद्या कोणतीही नुकसान भरपाईची वेळ आल्यास मध्य प्रदेशचे बियाणे असल्याने राज्य सरकार भरपाई देणार नाही, परिणामी या शेतकºयांना ही घाई अडचणीची ठरू शकते.बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकºयांची अडचणजिल्ह्यात मान्सूनपूर्व लागवड मेच्या पहिल्या आठवड्यात नेहमी व्हायची. ज्यांच्याजवळ पाणी उपलब्ध आहे, असे शेतकरी लागवड करून मोकळे व्हायचे. जेणे करून इतर शेतकºयांच्या तुलनेत कापूस आधी हाती यायचा. हे प्रमाण कमी असल्याने मजूरही सहज व कमी पैशात उपलब्ध होत असतो. पुढे रब्बीसाठीही शेत लवकर मोकळे होते, ही बाब लक्षात घेवून या लागवडीसाठी शेतकºयांची धावपळ असायची, परंतु शासनाने बोगस बियाणे व रोगराई टाळण्यासाठी २० मे दरम्यान लागवड करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर १५ तारखेनंतरच बियाणे बाजारात आणले जाणार आहे. यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीस होणारी लागवड जवळपास झालीच नाही.बोगस बियाणे रोखण्यासाठी १६ पथकेजिल्ह्यात बोगस बियाणे रोखण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर १ आणि जिल्हा स्तरावरील १ अशी एकूण १६ पथके नेमण्यात आली आहेत. या पथकात तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, वजन व मापे निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.२३ लाखांवर पाकिटे येणारजिल्ह्यात कापूस बियाण्यांची १७ ते १८ लाख पाकिटे लागतात. परंतु कृषी विभागाने दुबार पेरणी वगैरे हिशेब धरून २३ लाख २० हजार कापूस बियाणे पाकिटांची मागणी केली आहे. हे बियाणे १५ ते २० मे दरम्यान बाजारात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात बोगस बियाणे कोठेही नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यात प्रथमच मान्सूनपूर्व कापूस लागवडीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:43 PM
जिल्ह्यात बियाणे बोगस असण्याची शक्यता
ठळक मुद्देचोपडा तालुक्यात मध्यप्रदेशातील बियाण्याची लागवड२३ लाखांवर पाकिटे येणार