ऑनलाईन लोकमत
जळगाव ,दि.8- तालुक्यातील आव्हाणे येथे रविवारी रात्री दोन गटात झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. एका गटाकडून जळगाव शहरातून सुमारे पाचशे गुंडाना बोलावून गावातील दुस:या गटावर हल्ला करण्याचा प्रय} करण्यात आला असल्याचा आरोप दोडे गुर्जर समाज संघाटनाकडून करण्यात आला आहे. आव्हाणे येथे रविवारी झालेल्या दंगलीत बाहेर गावाहून आलेल्या गुंडावर कारवाईची मागणी गुर्जर समाज संघटनांकडून करण्यात आली असून यासंबधी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दोडे गुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, आव्हाण्याचे माजी उपसरपंच बबन वामन चौधरी, मुरलीधर मोहन पाटील, अॅड.हेमंत चौधरी, शिवसेनेचे भगवान पाटील, साहेबराव पाटील, रवींद्र चौधरी, अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेचे पदाधिकारी राकेश पाटील, नवलसिंग पाटील, श्रीराम पाटील, संदीप चौधरी, सचिन चौधरी, भूषण पाटील, किरण पाटील, दीपक पाटील, रावसाहेब चौधरी, हर्षल पाटील, योगेश चौधरी आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले होते की, गावात रविवारी झालेले भांडण किरकोळ स्वरुपाचे होते, मात्र समोरच्या गटाकडून गुंड प्रवृत्तीचे लोकांना हत्यारासह बोलावून गावातील वातावरण बिघडविण्याचा प्रय} केला. किरकोळ भांडण झाल्यानंतर लगेच जळगावहून पाचशे लोकांचा जमाव हत्यारासह गावात कसा आला? असा प्रश्न या निवेदनातून उपस्थित केला आहे. तसेच बाहेरून आलेल्या गुंडानी आव्हाणे ग्रामस्थांसोबतच पोलिसांवरदेखील हल्ला केला आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजीत स्वरुपाचा होता, या हल्लय़ातील दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या दंगलीदरम्यान गावात आलेल्या गुंडावर पोलीस प्रशासनाने वेळेवर आवर घातल्यामुळे गावात होणारा मोठा अनर्थ यामुळे टळला आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई केली नसती तर एका गटावर मोठा हल्ला झाला असता. त्यामुळे जळगाव पोलिसांचे या निवेदनात अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच समोरच्या गटाकडून नेहमी अॅट्रोसीटी कायद्याचा वापर करण्याची धमकी दिली जात असून अनेकवेळा खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. गुर्जर समाज शांतताप्रिय समाज असून, गावातील इतर अल्पसंख्याक समाजाशी नेहमी सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. मात्र या शांतीचा गैरफायदा एका समाजाकडून घेतला जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.