शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

पूर्वहंगामी कापूस लागवडीला ‘ब्रेक’

By admin | Published: May 17, 2017 1:54 PM

तापमान कमी होणार नाही तोर्पयत कुठेही लागवड होणार नसल्याचे चित्र असून

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 17 - उष्णता अधिक असल्याने जळगाव जिल्हाभरात अद्याप फक्त 400 हेक्टरवर पूर्वहंगामी (बागायती) कापसाची लागवड झाली आहे. जोर्पयत तापमान कमी होणार नाही तोर्पयत कुठेही लागवड होणार नसल्याचे चित्र असून, यामुळे कापूस बियाणे बाजारपेठेतही फारशी उलाढाल अद्याप सुरू झालेली नाही. जळगाव जिल्ह्यात कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख 60 हजार हेक्टर आहे. यंदा चार लाख 65 हजार हेक्टरवर लागवड होण्याची अपेक्षा आहे. पूर्वहंगामी कापूसही वाढणारयंदा बागायती किंवा पूर्वहंगामी कापसाची तब्बल 80  हजार हेक्टरवर लागवड होईल, असे अपेक्षित आहे. परंतु अधिक उष्णतेमुळे पूर्वहंगामी कापूस लागवडीला ब्रेक लागला आहे. मुळांची वाढ खुंटतेअधिक उष्णता म्हणजेच तापमान 43 ते 44 अंश सेल्सीअस असले तर कापसाची वाढ अपेक्षित गतीने होत नाही. रोपाच्या पांढ:या मुळ्य़ा कमकुवत होतात. त्यामुळे पिकात आकस्मिक मर रोग फोफावतो. 2012 मध्ये पूर्वहंगामी कापसावर जळगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा भागात अधिक उष्णतेमुळे आकस्मिक मर रोग आला होता. हा वाईट अनुभव लक्षात घेता यंदाही अद्याप काही भागांचा अपवाद वगळता कापसाची लागवड झालेली नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. चोपडा, यावल या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी लागवड झाली आहे. तसेच जळगाव तालुक्यातही तापीकाठावर लागवड झाल्याची माहिती मिळाली. बियाणे बाजारही थंडकापूस लागवडीला वेग आलेला                       नसल्याने कापूस बियाणे बाजारातही फारशी उलाढाल सुरू झालेली नाही. विविध कंपन्यांच्या जवळपास चार लाख बीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा झाला आहे. पण त्यांना उठाव नाही. यातच पुढील आठवडय़ातही उष्णता अधिक राहू शकते, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने आपल्या संकेतस्थावर वर्तविला आहे. एवढय़ा उष्णतेत मजुरही काम करण्यास नकार देत आहेत. स्वदेशी 5 ची प्रतीक्षादेशी सुधारित प्रकारातील स्वदेशी 5 या कापूस बियाण्याची कुठलीही आवक अद्याप झालेली नाही. कमी खर्चात अधिक उत्पादन देणा:या या वाणाची प्रतीक्षा शेतक:यांना आहे. अनेक कृत्रीम जलसाठा उपलब्ध असलेले शेतकरी स्वदेशी 5 च्या लागवडीस पसंती देतात. यासह राशी 659 या बीटी कापूस वाणाच्या विक्रीला बंदी आहे. यासंदर्भात कृषी आयुक्तालय, पुणे येथे सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. आठवडाभरात याबाबतचा निकाल समोर येईल. या वाणाच्या विक्रीला पुन्हा सुरूवात झाली तर त्याची लागवड करू म्हणूनही अनेकांनी अद्याप कापूस लागवड केलेली नसल्याचे चित्र आहे. तापमानाबाबतचा पुढील काही दिवसांचा अंदाज17 मे 43.7, 18 मे 43.3, 19 मे 43.9 अंश सेल्सीअस अर्थातच पुढील काळातही उष्णता राहणार असल्याने कापसाची लागवड टाळावी, असा सल्ला कृषी विभागाने जारी केला आहे.उष्णता अधिक असल्याने सध्या कापूस लागवडीसाठी अनुकूल वातावरण नाही. 25 मे नंतर लागवड करणे योग्य राहील. अद्याप स्वदेशी 5 या कापूस वाणाच्या पुरवठय़ाबाबतचे कुठलाही लक्ष्यांक किंवा पुरवठा वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केलेला नाही. -मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी