लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एरंडोल व पाचोरा तालुक्यात गारपीट तर जिल्हाभरात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.पारोळा तालुक्यात भोंडण, चोरवड, बहादरपुर, उंदिरखेडा यासह परिसरात अवकाळी पावसाने दुपारी ४ वाजता अर्धा तास झोडपून काढले.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेला मका ज्वारी या धान्याचे नुकसान झाले. भोंडण येथे बारीक गार पडल्याचे वृत्त आहे.उत्राण, ता़एरंडोल येथे दुपारी ३.५५ वाजता अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर सुमारे २० मिनिटे मुसळधार पाऊस झाला तर १८ अठरा मिनिटे गारपीट झाली़ अवकाळी पावसामुळे झाडांच्या फांद्या व काही घरांचे पत्रे उडाले. पाऊस व गारपीटीमुळे लिंबू व पेरू आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:37 PM
अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एरंडोल व पाचोरा तालुक्यात गारपीट तर जिल्हाभरात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पारोळा तालुक्यात भोंडण, चोरवड, बहादरपुर, उंदिरखेडा यासह परिसरात अवकाळी पावसाने दुपारी ४ वाजता अर्धा तास झोडपून काढले.
ठळक मुद्देएरंडोल व पाचोरा तालुक्यात गारपीटशेतकऱ्यांचे पुन्हा प्रचंड नुकसानउत्राणला १५ मिनीटे गारपीट