जळगाव : नववीच्या परीक्षेचा निकाल घ्यायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली १६ वर्षांची तरुणी चाळीसगावातून प्रियकरासोबत पळून गेली. मंदिरात जाऊन प्रियकराने तिला मंगळसूत्र घातले. दोघांनी अमळनेरात संसार थाटला. सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतानाच प्रियकर व प्रेयसी अल्पवयीन असल्याने पोलिसांच्या जाळ्यात अडकले अन् त्याची रवानगी थेट बालनिरीक्षणगृहात झाली.एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा ही घटना आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अल्पवयीनच मुलासोबत प्रेमाचे सूत जुडले. कायद्याने दोन्हीही अज्ञात. दोन्ही वेगवेगळ्या समाजाचे. घरातून लग्नाला विरोध होणार याची जाणीव झाल्याने दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.नववीचा निकाल असल्याचे सांगून ही मुलगी ३० मे रोजी सकाळी घरातून बाहेर पडली. तिकडे प्रियकर वाट पाहताच होता. त्याने रिक्षातून सामान आणला नंतर दोघांनी त्याच दिवशी रेल्वेने धुळ्याच्या दिशेने पलायन केले. मध्येच शिरुड गावाजवळ उतरुन पारोळा गाठले. तेथे प्रियकराने एका दुकानातून मंगळसूत्र व कानातील टोंगल विकत घेतले. तेथून अमळनेरला गेले. एका झोपडपट्टी वस्तीत रात्र काढली. दुसºया दिवशी गावाबाहेरील महादेव मंदिरात प्रियकराने महादेवाच्या साक्षीने प्रेयसीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. दोघांनी एकमेकांचा पत्नी-पत्नी म्हणून स्विकार केला.अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडले. अन्यथा त्यांचा संसार सुरु राहिला असता.आठवडाभर संसार केल्यानंतर पोलिसांनी घेतले ताब्यातमुलगी घरातून पळून गेल्याने तिच्या आजोबांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक रमेश मानकर व हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील हे मुलीच्या मागावर होतेच. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे व सायबर कक्षाचे विजय पाटील, नरेंद्र वारुळे हे तांत्रिक माहितीच्या आधारावर पलायन केलेल्या दोघांची माहिती तपास पथकाला देत होते. दरम्यान, अमळनेर येथे स्थायिक झाल्यानंतर प्रियकराने आठवडाभर दुसºयाच्या शेतात मजुरी म्हणून काम केले. दोघ पती-पत्नी म्हणूनच राहू लागले होते. १९ जून रोजी दोघं जण किराणा घेण्यासाठी शहरात गेले. तेथेच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.मुलीच्या वडिलांचे झाले आहे निधनदोघांना पोलीस ठाण्यात आणले असता तिथे मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. तिने दिलेल्या जबाबावरुन अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याने प्रियकराविरुध्द बलात्काराचे वाढीव कलम लावण्यात आले. त्यानंतर मुलीला आजोबांच्या ताब्यात देण्यात आले तर मुलाला जळगाव येथील बालनिरीक्षणगृहात पाठविण्यात आले. दरम्यान, या अल्पवयीन मुलीच्या वडीलांचे निधन झाले आहे. त्यानंतर आईने दुसरे लग्न केले, त्यामुळे ही मुलगी आईच्या वडीलांकडेच राहत होती.
चाळीसगाव तालुक्यात प्रेमीयुगुलाने पळून केले लग्न, मात्र अल्पवयीन असल्याने मोडला संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:56 PM
मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
ठळक मुद्देमुलगी आजोंबाकडे तर मुलगा निरीक्षणगृहातमुलीच्या वडिलांचे झाले आहे निधन