शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

तयारी विजयी जल्लोषाची : फटाके, फुलांना वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:38 IST

पेढे, मिठाई, गुलालाचीही सज्जता

जळगाव : लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ रोजी जाहीर होणार असल्याने मतमोजणीसाठी उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून त्यांच्याकडून विजयी जल्लोषाची तयारीदेखील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर फटाक्यांना मागणी वाढली असून फूल विक्रेत्यांनी फुलांचीही वाढीव मागणी पाहता त्याची उपलब्धता करून ठेवली आहे. या सोबतच पेढे, मिठाई, गुलालची अधिक विक्री होण्याच्या अंदाजाने दुकानदार सज्ज आहेत.२३ एप्रिल रोजी जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाल्यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागलेली आहे. ही उत्सुकता शिगेला पोहचली असताना उमेदवार, कार्यकर्ते यांच्याकडून विजयी जल्लोषाची तयारी केली जात असल्याचे विविध वस्तूंच्या मागणीवरून लक्षात येते. त्यात फटाक्यांना अधिक मागणी असून गेल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात तालुकास्तरावरील विक्रेत्यांनी फटाक्यांची उपलब्धता करून ठेवण्यासह कार्यकर्त्यांनीही फटाके खरेदी करून ठेवले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या सोबतच २३ रोजी आणखी विक्री होण्यात अंदाज आहे.या सोबतच विजयी उमेदवारांचे हार, फूल, बुके देऊन स्वागत करण्यासाठीदेखील तयारी केली जात आहे. यासाठी फूल विक्रेत्यांकडे फुलांची नोंदणी करून ठेवली जात आहे. निकालाच्या दिवशी ५० टक्क्याने विक्री वाढण्याचा अंदाज असल्याने फुलांचा अधिकचा साठा मागवून ठेवण्यात आला आहे. एरव्ही शहरात २५ क्विंटल फुलांची विक्री होते. निकालाच्या दिवशी ही विक्री १२ ते १३ क्विंटलने वाढण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.विजयी उमेदवाराचे तोंड गोड करण्यासाठी तसेच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी समर्थकांकडून पेढे व इतर मिठाईची मागणी वाढण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी उपलब्धता ठेवली आहे.निवडणूक निकालामध्ये ग्रामपंचायत, न.पा. निवडणुकांच्या निकालानंतर गुलालाचा अधिक वापर होतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालात याचा जास्त वापर होत नसल्याने विक्रेत्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी मागणीनुसार गुलालाची उपलब्धता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.गेल्या आठवड्यापासून फटाक्यांना मागणी असून तालुकापातळीवर विक्रेत्यांनीही त्याची खरेदी केलेली आहे.- युसुफ मकरा, फटाके विक्रेते.निकालाच्या पार्श्वभूमीवर फुलांना मागणी वाढणार असल्याच्या अंदाजाने तशी उपलब्धता करून ठेवली आहे.- मंगला बारी, फूल-हार विक्रेत्या.निवडणूक निकालासाठी पेढे, मिठाईला मागणी असते. अद्यापपर्यंत मागणी नसली तरी ऐनवेळी मागणी झाल्यास तशी उपलब्धता आहे.- भाविक मदाणी, मिठाई विक्रेते.ग्रामपंचायत निवडणुकीवेळी गुलालला मागणी असते. लोकसभा निवडणुकाच्या निकालानंतरही मागणीवाढलीतरउपलब्धताआहे.- कमलेश सुरतवाला,गुलालविक्रेते.

टॅग्स :Jalgaonजळगाव