जळगाव : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला रोखायचे असेल, तर शिवसेनेसह समविचारी पक्षांनी आमच्यासोबत आले पाहिजे ही भाजपाची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात दानवे जळगावी आले होते.मतदारसंघ दौºयांची माहिती देऊन दानव म्हणाले की, भाजपाने गेल्या चार वर्षांत पायाभूत सुविधा, शेतकºयांना कर्जमाफी, दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात तत्परता दाखविली आहे मात्र, गेली २५ वर्षे सत्तेत राहूनही आपण राज्याचा विकास करू शकलो नसल्याचे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लक्षात आल्याने आता ते भाजपाला विरोध करीत आहेत.निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेनेसह समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे. पक्ष म्हणून सेनेची भूमिका वेगळी आहे मात्र, सरकार म्हणून त्यांच्यासोबत आमचे मतभेद नाहीत, असा दावा त्यांनी केला.ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागतशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे श्रीराम मंदिरासाठी अयोध्येला जात असल्याचे त्यांनी स्वागत केले. राजू शेट्टीचे आंदोलन सुरू असले तरी शेतकरी सरकारच्या भूमिकेवर समाधानी असल्याचेही दानवे म्हणाले.महाजनांची दांडीअजित पवार यांना केव्हाही अटक होऊ शकते असे दानवे यापूर्वी म्हणाले होते. हा विषय चर्चेत येण्याची शक्यता घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत येणे टाळल्याची चर्चा सुरू होती.
समविचारी पक्षांशी युतीस तयार; पत्रपरिषदेत रावसाहेब दानवे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:21 PM
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचा आढावा
ठळक मुद्देठाकरेंच्या भूमिकेचे स्वागतगिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत येणे टाळल्याची चर्चा